घरट्रेंडिंग'आलिया भात' किंवा 'शाहरुख नान' तुम्ही खाल्लंय कधी?

‘आलिया भात’ किंवा ‘शाहरुख नान’ तुम्ही खाल्लंय कधी?

Subscribe

मुंबईतील एक रेस्टॉरंट बॉलिवूडच्या नामांकीत सेलिब्रिटींच्या नावावर आधारित पदार्थ विकले जात आहेत.

तुम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तिथे पनीर बटर मसाला, बटर नान, बिर्याणी अशा किंवा  इतर नावाचे वेगवेगळे पदार्थ बघितले असतील. कधीकाळी तुम्ही तसे पदार्थ चाखलेही असतील. पण तुम्ही कधी पनीरिता बटर मसाला, आलिया भात किंवा शाहरुख नान या नावाचे खाद्य पदार्थ चाखले किंवा बघितले आहेत का? नाही म्हणजे मुंबईतील ‘हिचकी’ या रेस्टॉरंटमध्ये या आगळ्यावेगळ्या नावांच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या नावाचे पदार्थ मिळतात. या रेस्टॉरंटची थीम एकंदरीतच बॉलिवूड असल्यामुळे तिथे मिळणाऱ्या पदार्थांच्या नावांचा बॉलिवूडशी संबंध असल्याचे पाहायला मिळते.

‘हिचकी’ या रेस्टॉरंटने त्यांच्या मेन्यूमध्ये ‘गोगो तुसी ग्रेट हो’ नावाची एक अनोखी थाळी आणलेली आहे. अंदाज अपना अपना या चित्रपटातील खलनायक क्राईम मास्टर गोगोच्या आठवणीने या थाळीचे नाव ठेवले आहे. या थाळीमध्ये पनीरिती बटर मसाला, शाहरुख नान, आलिया भात, सलमान पान, कटरहीहैना सलाद, प्रियांका कोपरा चटणी, कॉफी विथ गरम, अनुपम खीर आणि चिकना रनौत मसाला या अनोख्या नावाचे पदार्थ उपलब्ध आहेत. गोगो तुसी ग्रेट हो या अनोख्या थाळी व्यतिरिक्त आणखी अनोख्या नावाचे पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये मिळतात. ‘तेरे मेरे बीच में’, ‘कितने आलू थे’, ‘कबाब में हड्डी’, ‘उलटा पंजाब’, ‘अंडाज अपना अपना’, ‘शोले भटुरे’ या सारख्या बॉलिवूडची ट्विस्ट असलेली पदार्थ या रेस्टॉरंटमध्ये मिळतात.

- Advertisement -

हिचकी हे रेस्टॉरंट बॉलिवूडच्या गोड आठवणी घेऊन चालते. बॉलिवूड कडून या रेस्टॉरंटला फार प्रेरणा मिळते आणि आणखी नवीन संकल्पना सूचतात असे हिचकीच्या मुख्य अधिकारी यांनी म्हंटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -