घरमनोरंजनप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

Subscribe

हृदयविकाराच्या झटक्याने सरोज खान यांचे निधन

बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे १.५२ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या अस्वस्थ होत्या. त्यामुळे त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांची तब्येत खालावली आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.

- Advertisement -

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सरोज खान यांना २० जून रोजी गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी त्याची कोविड टेस्ट झाली होती, जी निगेटिव्ह आली होती. सरोज खानच्या कुटूंबियांनी सांगितले की, त्यांच्या तब्येतीत हळू हळू सुधारणा होत होती. त्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. परंतु रात्री उशिरा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

फिल्म अभिनेत्री निमरत कौर यांनी सरोज खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, सरोज ज्यांच्या नावाने माझ्या आयुष्यात’ नृत्यदिग्दर्शक’ हा शब्द आला आहे, असे त्यांनी ट्विट करत सरोज यांना श्रद्धांजली दिली आहे.

दरम्यान, माधुरीच्या एक दोन तीन या नृत्यामुळे सरोज खान अधिक लोकप्रिय झाल्यात. अभिनेत्री माधुरी दीक्षित त्यांची आवडती शिष्या होती. बॉलिवूडमधील स्पर्धाबद्दल बोलताना त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं देखील केली होती. तसेच ‘कास्टिंग काऊच’ आणि ‘मी टू’ सारख्या विषयावर देखील त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले होते.

कोरिओग्राफीच्या कलेमुळे सरोज यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार

सरोज खान या बॉलिवूडच्या उत्कृष्ट नृत्य प्रशिक्षिका आहेत. त्यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.

कोरिओग्राफीच्या कलेमुळे सरोज खान यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात, डोला-रे-डोला या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’ या चित्रपटाचं गाणं एक-दोन-तीन आणि २००७ मधील ‘जब वी मेट’ या गाण्याचे ‘ये इश्क’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

अनेक चित्रपटाच्या गाण्यातील कलाकारांना दिले प्रशिक्षण

मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जब वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठोड़, एबीसीडी, तनू वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यासारख्या अनेक चित्रपटातील गाण्यातील कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.


श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -