घरमनोरंजन'बिग बॉस १२'च्या विजेतीला अॅसिड हल्ल्याची धमकी!

‘बिग बॉस १२’च्या विजेतीला अॅसिड हल्ल्याची धमकी!

Subscribe

दीपिका कक्कर ही ‘बिग बॉस सिझन १२’ ची विजेती ठरल्यानंतर माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. यातीलच एका चाहत्याने दीपिकावर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीत चर्चेचा विषय ठरतो. या कार्यक्रमाची लोकप्रियताही तितकीच आहे. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमाच्या १२व्या सिझनचा विजेता घोषित झाला. माजी क्रिकेटपटू श्रीसंत हा या कार्यक्रमाचा विजेता होईल असा अंदाज बांधला जात होता. परंतु, अभिनेत्री दीपिका कक्करने बाजी मारत या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे श्रीसंतच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. यातील एका चाहत्याने तर ट्विटरवर दीपिकावर अॅसिड हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर या चाहत्याने आक्षेपार्य भाषेचा वापर केला आहे. तू बाहेर कुठेही भेट, तुझ्यावर अॅसिड फेकून तुला मारेल, असे या चाहत्याने म्हटले आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा – दीपिका कक्कर ठरली ‘बिग बॉस १२’ ची विजेती

- Advertisement -

मुंबई पोलिसांनी घेतली दखल

दीपिकावर अॅसिड हल्ल्याची पोस्ट वाचल्यावर दीपिकाचा एक चाहता नाराज झाला. त्याने ताबोडतोब मुंबई पोलिसांना याविषयी माहिती दिली. मुंबई पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली. त्यांनी दीपिकाच्या फॅन पेजवर ट्विट करत या प्रकरणावर लक्ष देत असल्याचे सांगितले.


 हेही वाचा – फाइव्ह स्टार हॉटेलपेक्षा सुंदर आहे,बिग बॉसच्या १२व्या सिझनचं घरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -