‘तुझी बोलायची हिम्मत कशी झाली?’; कंगनावर भडकली फराह खान

kangana-ranaut
कंगना राणौत (सौजन्य - न्यूजफॉलो)

कंगना रनौत हिने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करतानाचे ट्विट शेअर केले आहेत. तिने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणारा व्हिडिओदेखील जारी केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर बॉलीवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. काहींनी तिच्या या धाडसाने कौतुक केले तर काहींनी तिच्या टिका केली आहे. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आणि संजय खान यांची कन्या फराह खान हिने मात्र कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. तिने ट्विट करत कंगनाच्या वागण्यावर नाराजी दर्शवली आहे.

काय म्हटले आहे फराह खान यांनी ट्विटमध्ये

गंमत म्हणजे गर्वाची भाषा करणाऱ्याकडे तो जास्त आहे. जसे ती (कंगना) म्हणजे की, वेळ बदलते आणि सर्वांची वेळ येते. यामध्ये तिचाही समावेश होतो. मी खोट्या बोलण्यापेक्षा खर बोलणे पसंत करते. आणि यासाठी मला ट्रोल केले तरी मला त्याची चिंता नाही. कोणाला तरी हे सांगावेच लागेल. तसेच पुढे तिने म्हटले आहे की, तिच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संबोधित करण्याची शालिनता नाही. ती त्यांना तू करत एकेरी हाक मारते. ते राज्याच्या नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे त्यांचा आदर का केलाच पाहिजे. ती तिचा दर्जा दाखवत आहे. तुम्ही नाही तू, तुला काय वाटतं. माझ्याकडे काही नेत्यांच्या शंभर एक तक्रारी असू शकतात. पण मी कधीही कोणाला वैयक्तिकरित्या अपमानित केले नाही आणि पुढे करणारही नाही. कारण मला लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा आदर करण्यास शिकवले आहे. जरीही मी त्यांच्या राजकीय विचारांशी सहमत नसले तरीही.

हेही वाचा –

काँग्रेस पक्षात बदल; खरगे, गुलाम नबी यांना महासचिव पदावरून हटवले