बॉलीवूडची ‘नवी जोडी’ सोशल मीडियावर हिट

अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल, व्हीजे शिबानी दांडेकर हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Mumbai
सौजन्य - इन्स्टाग्राम

दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निक यांच्या ग्रँड वेडिंग्सनी २०१८ हे वर्ष दणाणून सोडलं. वर्षाअखेरीला झालेल्या या दोन्ही बीग फॅट वेडिंग्सनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. यंदाच्या वर्षीही बॉलीवूडमधला हा लग्नाचा मौसम तसाच राहणार असल्याची चर्चा रंगते आहे. सूत्रांनुसार, २०१९ मध्ये बी-टाऊन मधील काही बहुचर्चित कपल्स विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. यामध्ये अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा तसंच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोन जोड्यांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. याशिवाय एक आणखी सेलिब्रिटी जोडी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल, व्हीजे शिबानी दांडेकर ही जोडी पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रकाशझोतात आली आहे. गेल्या काही काळापासून फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, या दोघांचा स्वीमिंग पूलमध्ये मस्ती करतानाचा एक फोटो सध्या  तुफान व्हायरल होतो आहे. या फोटोला जगभरातील लोकांकडून पसंती मिळते आहे. इतकंच नाही तर या फोटोवर ‘तुम्ही लग्न कधी करणार, लग्नाची तारीख नक्की कळवा’ अशा प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांकडून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

As long as I have you As long as you are I’ll never be lost Shine on beautiful star ☀️❤️ @shibanidandekar love you loads

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

 गुपचूप उरकला साखरपुडा?

लोकांमध्ये आणि बॉलीवूडमध्ये रंगत असलेल्या चर्चांनुसार, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी गुपचूप त्यांचा साखरपुडा उरकला आहे. याशिवाय हे दोघे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, शिबानी किंवा फरहान यांच्याकडून लग्नाविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केले केले आहेत. इतकंच नाही तर अनेक सार्वजनिक समारंभात तसंच पार्ट्यांमध्ये ही जोडी एकत्र दिसली आहे. रणवीर आणि दीपिकाच्या रिसेप्शनलाही त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे एकंदरच या सगळ्या हालचालींवरुन आणि सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या रोमँटिक पोस्टवरुन, शिबानी आणि फरहान लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मध्यंतरी या दोघांनी एकमेकांची आपापल्या कुटुंबिंयासोबत भेट घडवून आणली होती, ज्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

✨ @faroutakhtar ✨

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here