बॉलिवूडमधलं अजून एक सेलिब्रिटी ब्रेक अप!

फॅशन डिझायनर मसाबा हिने आपल्या पती पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने चित्रपट निर्माता पती मधू मंतेना याच्यासोबत २०१५ला विवाह केला होता. या दोघांना आपल्या वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मसाबाने मधूसोबतच्या नात्यातून आपण विभक्त होत असल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केलं.

mumbai
masaba gupta
मसाबा गुप्ता

बी टाऊनमध्ये ब्रेकअप होणं यात आता काही नवीन राहिलेलं नाही. नुकतीच फॅशन डिझायनर मसाबा हिने आपल्या पती पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने चित्रपट निर्माता पती मधू मंतेना याच्यासोबत २०१५ला विवाह केला होता. या दोघांना आपल्या वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. मसाबाने मधूसोबतच्या नात्यातून आपण विभक्त होत असल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केलं.

मसाबा नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे निवृत्त क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मधू आणि मसाबा या दोघांमधील वादाची चर्चा रंगत होती. अखेर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

A post shared by Mufasa✨? (@masabagupta) on

मसाबाने लिहिलंय, ‘मला ही बाब सांगण्यास अतिशय दु:ख होत आहे. पण मधू आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांशी आणि आमच्या कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतरच आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहोत. स्वत:ला काय हवं हे ठरवण्याची आता गरज आहे. त्यामुळे या नात्यातून आम्ही विभक्त होत आहोत. हा काळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. मला खात्री आहे आमच्या खासगी आयुष्याविषयी गोपनियता पाळली जाईल. सध्याच्या घडीला आम्ही कोणालाही उत्तर देण्याच्या मन:स्थितीत नाहीत’.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here