घरमनोरंजनपल्लवीने जपली आईची आठवण

पल्लवीने जपली आईची आठवण

Subscribe

फॅशन ही कितीही विस्तारलेली असली तरी भारतीय स्त्रियांना साड्यांचा मोह काही आवरता येत नाही. प्रत्येक साडीमागे एक आठवण दडलेली असते. वापरत नसतानासुद्धा कितीतरी स्त्रिया ती जपून ठेवतात. क्लासमेट, शेंटीमेंटल, सविता दामोदर परांजपे, तू तिथे असावे, बॉईज-2 या चित्रपटांमध्ये दिसलेली गुणी अभिनेत्री पल्लवी पाटील तुम्हाला आठवतच असेल. अभिनेत्री म्हणून ती तुम्हाला परिचयाची आहेच, परंतु फॅशनेबल कपडे डिझाईन करणे हीसुद्धा तिची आवड आहे. तिची आई साड्यांची फार शौकीन आहे. साखरपुड्यापासून तर ते अगदी पल्लवी चित्रपटात स्थिर होईपर्यंत अनेक साड्या तिने संग्रही ठेवलेल्या आहेत. वापरत नाही म्हणताना नेहमीप्रमाणे ती वाटून का टाकत नाहीस असे घरातील सदस्य प्रत्येकवेळी विचारत असतात आणि मग तिचे ठरलेले उत्तर असायचे की त्यात माझ्या आठवणी दडलेल्या आहेत. पल्लवीने यातून एक सुरेख मार्ग काढलेला आहे. तो म्हणजे याच साड्यांपासून तिला स्वत:ला परिधान करता येतील असे फॅशनेबल कपडे तिने शिवलेले आहेत. आईच्या इच्छेप्रमाणे ती समोर राहिली आणि त्याचा सुरेख वापर झाला याचा आनंद पल्लवीला अधिक झालेला आहे. अनेक जण या कल्पक, सुरेख ड्रेस डिझाईनचे कौतुक करत आहेत म्हणताना पल्लवीला काही राहवले नाही. ड्रेस त्याप्रमाणे रंगभूषा, केशरचना करून तिने स्वत:चे फोटोशूट तर केलेच, परंतु आता प्रतिष्ठेच्या सोहळ्यातही ते तिने परिधान करण्याची तयारी दाखवलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -