घरताज्या घडामोडीफिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'गल्ली बॉय'ने मारली बाजी

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘गल्ली बॉय’ने मारली बाजी

Subscribe

जोया अख्तरच्या 'गल्ली बॉय' या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात तब्बल १० पुरस्कार मिळाले आहेत.

६५ व्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ‘गल्ली बॉय’ चित्रपटाने बाजी मारली आहे. यावर्षीच्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाने १० पुरस्कार मिळवून एक नवीन रिकॉर्ड बनवला आहे. आलिय भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात रणवीर सिंगने एक रॅपरची भूमिका केली होती. रणवीरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगलाचं धुमाकूळ घातला होता.

View this post on Instagram

A humble bunch! *drops mic walks away* ?? #gullyboy

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

- Advertisement -

यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट फिल्मफेअर पुरस्कारवर देखील ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाने आपलं नावं कोरलं आहे. तसंच या चित्रपटाची दिग्दर्शिका जोया अख्तरला देखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘अपना टाइम आएगा’ या गाण्यासाठी डिवाइन आणि अंकिता तिवारीला सर्वोत्कृष्ट गीत हा पुरस्कार मिळाला आहे.

याशिवाय सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) म्हणून ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे तर अभिनेता आयुष्मान खुरानाने सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा पुरस्कार ‘स्टूडेंट ऑफ द इयर २’ मधल्या अभिनेत्री अन्यया पांडेने पटकावला आहे.

- Advertisement -

फिल्मफेअर पुरस्कारांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – गल्ली बॉय
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – आर्टीकल १५ आणि सोनतचिरीया
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – जोया अख्तर (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) – भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू (सांड की आँख)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती) – आयुष्मान खुराना
सर्वोत्कृष्ट अल्बम – गल्ली बॉय आणि कबीर सिंग
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजीत सिंह (कलंक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव (वॉर)
सर्वोत्कृष्ट संवाद – विजय मौर्या (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट पटकथा – रीमा कागती आणि जोया अख्तर (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथा – अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकी (आर्टिकल १५)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) – आदित धर (उरी – द सर्जिकल स्ट्राइक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण) – अभिमन्यू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) – अनन्या पांडे (स्टूडेंट ऑफ द इयर २)
सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट – वॉर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अमृता सुभाष (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धांत चतुर्वेदी (गल्ली बॉय)
सर्वोत्कृष्ट गीत – अपना टाइम आएगा (गल्ली बॉय)


हेही वाचा – ‘बिग बॉस १३’ चे विजेतेपद सिद्धार्थ शुक्लाकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -