बागी ३ साठी अखेर ‘या’ अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब

बागी ३ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीवर निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

Mumbai
प्रतिनिधीक फोटो
बागी ३ चित्रपटाला अभिनेत्री मिळाली

टायगर श्रॉफ आणि ‘बागी ३’ अलिकडे खुप चर्चेत आहे. ‘बागी ३’ या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून टायगर श्रॉफचं नाव तर आधीच पक्क आहे. पण अभिनेत्रीच्या निवडीची चर्चा सुरु होती. त्यासाठी सारा आली खान हिचं नाव समोर येत होत. मात्र तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या बागी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर २०१८ ला बागी २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यामध्ये दिशा पटानी प्रमुख भूमिकेत होती. २०१८ साली बागी २ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. परंतू हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टायगरने बागी ३ ची घोषणा केली होती.

अभिनेत्रीचा शोध संपला 

२०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बागी ३ या चित्रपटामध्ये टायरग पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. असे असले तरीही या चित्रपटासाठी अद्याप अभिनेत्रीची निवड झाली नव्हती. मात्र, आता निर्माते साजिद नाडियाडवाला यांना बागी ३ साठी योग्य अभिनेत्री सापडली आहे, असे समजते. या चित्रपटासाठी साजिद यांनी श्रद्धा कपूरच्या नावावरच शिक्कामोर्तब केला आहे. या चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या विषयावर सगळ्यांनीच आपापले तर्क लावले होते. हे तर्क-विर्तक खोडून काढत साजिद यांनी श्रद्धाला पसंती दर्शवली आहे.

बागी ३ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा

बागी २ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. बागी ३ हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बागी ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान करणार आहेत. यापूर्वीच्या दोनही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी बागी ३ कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.