घरमनोरंजन'या' आरोपांमुळे 'तांडव'च्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

‘या’ आरोपांमुळे ‘तांडव’च्या विरोधात लखनौमध्ये FIR दाखल

Subscribe

लखनौमध्ये हजरतगंज पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात हा एफआयआर दाखल

तांडव ही वेबसिरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. मात्र ही वेब सिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेब सीरिजमध्ये भगवान शंकर आणि राम या हिंदू देवतांवर आधारित एक खास सीन दाखवण्यात आला आहे. या सीनमुळे सोशल मीडियावर वेब सिरिजवरून नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ‘तांडव’च्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन प्राईमच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, वेब सीरिजचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकावर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

म्हणून केला FIR दाखल

‘तांडव’च्या विरोधात लखनौमध्ये हजरतगंज पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये असे नमूद करण्यात आले की, एका विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात अयोग्य चित्रण करण्यात आल्याचं नमूद करण्यात आले आहे. असेही सांगितले जात आहे की, या वेब सीरिजचा इंटरनेटच्या माध्यमातून व्यापक प्रचार करण्यात येत आहे आणि त्यामुळे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळेच एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हा एफआयआर अॅमेझॉन प्राईम इंडिया हेड अपर्णा पुरोहित, तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक अब्बास अली, निर्माते हिमांशू कृष्ण मेबेर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. 153A, 295, 505 (1)(b), 505(2), 469, 66, 66f, 67 या कलमांतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला. तांडव ही वेब सीरिज प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. तसेच हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले होते.

असा आहे तो सीन?

तांडव वेबसिरिजमध्ये (Tandav Webseries) अभिनेता जीशाय अयूब हा नारदाच्या व्यक्तिरेखा असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की, ‘भगवान काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतयं की आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान असे म्हणतो की, मग काय करू, बदलू का? त्यावर त्याला नारद म्हणतो की, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.’ तांडव वेबसिरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान मुख्य भुमिकेत आहे. त्याचबरोबर डिंपल कापाडिया, गौहर खान, जीशान अयबू, सुनिल गोव्हर यांचा अभिनय पहायला मिळतो. या वेब सिरिजचे खास आकर्षण म्हणजे ही संपूर्ण वेब सिरिज सैफ अली खानच्या प्रसिद्ध अशा पतौडी पॅलेसमध्ये शुट करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -