घरमनोरंजन'लस्ट स्टोरीज'चा फर्स्ट लुक आऊट! आकाश ठोसरचीही भूमिका!

‘लस्ट स्टोरीज’चा फर्स्ट लुक आऊट! आकाश ठोसरचीही भूमिका!

Subscribe

लस्ट स्टोरीजचा फर्स्ट लुक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने आपल्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे. ‘#NetflixIndia वर झोया, दिबाकर, अनुराग आणि मी लस्ट स्टोरीज घेऊन आलो आहोत. ‘ असे ट्विट करण जोहरने केले आहे. येत्या जूनमध्ये करण जोहर लस्ट स्टोरीज घेऊन येत असून राधिका आपटे, विकी कौशल, संजय कपूर, मनिषा कोईराला, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी, नेहा धुपिया आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सैराटफेम आकाश ठोसरला करण जोहरच्या लघुपटात काम करायला मिळणं हा जॅकपॉटच आहे.

वेबसिरीजमध्ये कोणतेही विषय अगदी सहजपणाने मांडता येतात आणि विषयांचे बंधन नसते. त्यामुळे लस्ट स्टोरीजच्या या ट्रेलरमध्ये सगळ्याच कलाकारांचा सहज अभिनय दिसून येत आहे. लस्ट स्टोरीजमध्ये चार वेगवेगळ्या कथा असून करण जोहर व्यतिरिक्त झोया अख्तर, अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी यांनी या कथांचे दिग्दर्शन केले आहे. वासना हा चारही कथांमधील समान धागा असून याभोवती चारही लघुकथा फिरत आहेत. आशी दुवा आणि रोनी स्क्रूवाला यांच्यामुळेच ही कथा प्रेक्षकांसमोर आणता आल्याचे मत करण जोहरने व्यक्त केले आहे.

- Advertisement -

दरम्यान बऱ्याच कालावधीनंतर मनिषा कोईरालाच्या चाहत्यांना तिला बघता येणार असून भूमी पेडणेकरची एक वेगळी भूमिका या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहता येईल. सध्या वेबसिरीजची चलती असून तरूणाईमध्ये त्याची क्रेझ आहे.
जून महिन्यात नेटफ्लिक्स इंडियावर लस्ट स्टोरीज ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Zoya, Dibakar ,Anurag and myself are back with our anthology! #LustStories on @NetflixIndia …thank you for giving us this opportunity @RonnieScrewvala and @ashidua_fue ….presenting the trailer https://t.co/d9gUyUuXfI
— Karan Johar (@karanjohar) May 18, 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -