घरमनोरंजनसोनाली बनली 'माधुरी', म्हणतेय 'वय विचारु नका'

सोनाली बनली ‘माधुरी’, म्हणतेय ‘वय विचारु नका’

Subscribe

'माधुरी-वय विचारू नका' या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी चित्रपटांच्या निर्मीती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘…आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सुलोचना दीदींची भूमिका साकारणार आहे. सुलोचना दीदींच्या अवतारातील सोनालीच्या लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. मात्र, यासोबतच सोनालीचा आणखी एक नवा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. ‘माधुरी-वय विचारू नका’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकताच सोनालीने या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णीसोबत शरद केळकर, संहिता जोशी आणि अक्षय केळकर हे कलाकारही दिसत आहेत. सोशल मीडियावर या फर्स्ट लूक पोस्टरला चाहत्यांची पसंती मिळते आहे. याशिवाय ‘माधुरी-वय विचारू नका’ हे चित्रपटाचं मजेशीर नावही चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे ‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी चित्रपटांच्या निर्मीती क्षेत्रात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिलाने या चित्रपटाची एक झलक रिलीज केली होती पण त्यामध्ये ‘माधुरी’ कोण? हबे गुपित ठेवलं होतं. दरम्यान सोनालीचा ‘माधुरी-वय विचारू नका’ हा चित्रपट ३० नोव्हेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटातील सोनालीचा लूक

चित्रपटाची पहिली झलक

- Advertisement -


वाचा: अभिनेता सुबोध भावे याची वेबसाईट लाँच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -