घरमनोरंजन‘बिग बींचे ‘ते’ ट्विट मोदींविरोधात तर नाही?’

‘बिग बींचे ‘ते’ ट्विट मोदींविरोधात तर नाही?’

Subscribe

अमिताभ बच्चन यांच्या काव्यमय ट्विटनंतर चाहत्यांचा सवाल.

किंमत दोघांनाही चुकवावी लागते, बोलणाऱ्यांना आणि शांत बसणाऱ्यांनाही.. सोशल मीडिया की पहचानी है जानी मानी कहानी है..’ हे ट्विट केलंय बिग बी अमिताभ बच्चन यांनी. त्यांच्या या ट्विटची चर्चा होत असून हे ट्विट नक्की कोणत्या संदर्भात केलंय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अभिताभ बच्चन आपल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच ते सोशल मीडियावरील लिखाणासाठीही प्रसिद्‌ध आहेत. नेहमीच काही ना काही माहिती ते सोशल मीडियावर टाकत असतात. अनेकदा त्यांचं वक्तव्य सूचक पद्धतीचं असतं, तर अनेकदा काव्यमय पद्धतीने ते लिहितात.

- Advertisement -

आताच्या ताज्या ट्विटमध्येही त्यांनी काव्यात्मक पद्धतीने लिहिलंय. अनेक चाहत्यांनी त्याबद्दल त्यांचं कौतुक केले आहे, मात्र काही चाहते त्यांना प्रतिक्रिया देऊन विचारत आहेत की हे वक्तव्य देशाच्या सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल तर नाही ना? एका चाहत्याने म्हटलेय की ‘यह मोदी की महंगाई से रिलेटेड है क्या?’ अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या सिनेमांविषयी, त्यातील आशयाबद्दल माहिती देत असतात. अलिकडेच त्यांनी गुलाबो सिताबो या चित्रपटाचे एक ट्विट शेअर केलंय. शुजित सरकारचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ते आयुष्यमान खुराणा सोबत काम करताना दिसतील. तेव्हा हा चित्रपट राजकारणावर आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

आपल्या चित्रपटसृष्टीतील कार्यकाळात अमिताभ बच्चन यांनी राजकारणावर आधारित केलेल्य आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये अंधा कानून, इन्कीलाब यासारख्या काही चित्रपटांचा समावेश होतो. अलिकडच्या काळात सत्याग्रहसारखे चित्रपटही त्यांनी केले आहेत. त्यांनाही चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. मात्र नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये ते दिसून आले. अलिकडेच प्रदर्शित बदला या त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली. तापसी पन्नू या अभिनेत्रीने त्यांच्यासोबत काम केलंय, पिंकमध्येही तापसी पन्नूची भूमिका होती. या दोन्ही चित्रपटातील बिग बींचा अभिनय आणि भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले हे ट्विट चित्रपटासंबंधी आहे की वास्तव जगातील राजकारणाबद्दल हे मात्र संबंधित चित्रपट प्रसिद्‌ध झाल्यावरच स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -