Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ट्रेंडिंग Sushant Singh Rajput Case : FIR विरोधात रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव!

Sushant Singh Rajput Case : FIR विरोधात रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव!

Mumbai
bollywood sushant singh rajput & Rhea Chakraborty
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती

बॉलीवूड स्टार दिवंगत सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीच्या विरोधात सुशांतचे वडील के के सिंह (KK Singh) यांनी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्याभरापासून सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. कलम ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२०, ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात आता रियाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

रिया व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतचा मानसिक छळ केला. त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असा गंभीर आरोप के के सिंह यांनी केला आहे. सुशांतच्या वडीलांनी आरोपपत्रात मुंबई पोलीस करत असलेल्या तपासावर अविश्वास व्यक्त केला आहे. यामुळेच या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांनी करावा अशी विनंती सिंह यांनी केली आहे. तसेच सुशांत मैत्रीण रिया चक्रवर्ती (Actor Rhea Chakraborty Fir) आणि तिच्या कुटुंबीयांवरही सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने, सुशांतची फसवणूक केली. त्याच्याकडून करोडो रुपये उकळले. तसेच त्याला कुटुंबापासूनही दूर राहण्यासाठी दबाव टाकला होता. यात रियाचे नातेवाईकही सामील होते, असेही सिंह यांनी तक्रारीत म्हटलय.

काय म्हटयल तक्रारीत

रियाचे नातेवाईक इंद्रजीत चक्रवर्ती, संध्‍या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी सुशांतबरोबर जवळीक वाढवली होती. ते सुशांतच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत होते. सुशांत आधी ज्या घरात रहात होता. त्या घरात भूत असल्याचे सांगत त्यांनी त्याला ते घर सोडावयास भाग पाडले. यामुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली.

तो मुंबई विमानतळाजवळील रिसोर्टमध्ये राहू लागला. त्यानंतर रिया सतत त्याला तुझे मानसिक आरोग्य ढासळले असल्याचे बोलू लागली. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असून चांगल्या डॉक्टरची तुला गरज असल्याचे तिने त्याला सांगितले. याबद्दल कळताच माझी मुलगी सुशांतला भेटली व तिने त्याला घरी पाटण्याला आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिया व तिच्या कुटुंबियांनी सुशांतला मुंबईतच राहण्यासाठी दबाव आणला. येथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझी मुलगी पाटण्याला एकटीच परतली, असे सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.


हे ही वाचा – रियाने सुशांतकडून उकळले करोडो रुपये, क्रेडीट कार्ड, कॅश, दागिने केले होते लंपास


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here