घरमनोरंजनफोर्ब्सच्या यादीतून शाहरुख बाहेर; सलमान आणि अक्षय टॉपवर

फोर्ब्सच्या यादीतून शाहरुख बाहेर; सलमान आणि अक्षय टॉपवर

Subscribe

प्रसिद्ध मॅगझिन 'फोर्ब्स'च्या यादीत सर्वांना पिछाडीवर टाकत अक्षय कुमार भारतीय सेलिब्रिटीजमध्ये पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. सलमान खानदेखील यादीत मात्र शाहरूख खानचा समावेशही नाही.

प्रसिद्ध मॅगझिन ‘फोर्ब्स’नं जगभरात सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सर्वांना पिछाडीवर टाकत अक्षय कुमार भारतीय सेलिब्रिटीजमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे दरवर्षी या यादीत स्थान मिळवणाऱ्या शाहरूख खानला या वर्षी या यादीचा भागही होता आलेलं नाही. दरम्यान अक्षय कुमार आणि सलमान खान या दोघांच्याही नावांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘फोर्ब्स’नं तयार केलेल्या या यादीमध्ये अमेरिकन बॉक्सर फ्लोयड मेवेदर २८.५ कोटी डॉलर अर्थात १९.४९ अब्ज रुपये इतक्या कमाईसह सर्व सेलिब्रिटीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

अक्षय कुमार ७६ व्या स्थानावर

‘फोर्ब्स’नं तयार केलेल्या १०० लोकांच्या यादीमध्ये अक्षयकुमारला ७६ वा क्रमांक मिळाला असून सलमान खानला ८२ वा क्रमांक मिळाला आहे. शाहरुख खानचं नाव दरवर्षी या यादीमध्ये झळकतं. मागच्या वर्षी अर्थात २०१७ मध्ये शाखरूख खानकडे ३८ दशलक्ष डॉलर कमाई असल्यामुळं ६५ वं स्थान मिळालं होतं. मात्र यावर्षी शाहरूख खानचा संपूर्ण १०० नावांमध्ये समावेशही नाही. तर, फोर्ब्सच्या यादीनुसार, अक्षय कुमारनं या वर्षी ४.०५ कोटी डॉलर अर्थात साधारण ३.०७ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अक्षयकुमारनं साधारण २० ब्रँडचा प्रचार केला आणि त्यातून त्याची जास्त कमाई झाल्याचं फोर्ब्समध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, अभिनेता सलमान खाननं यावर्षी ३.७७ कोटी डॉलर अर्थात साधारण २.५७ अब्ज रुपये इतकी कमाई केली आहे. दरम्यान फोर्ब्स ही माहिती स्वतः घेतलेल्या मुलाखती तसेच नेल्सन, पोलस्टार, साऊंडस्कॅन, कॉमस्कोअर यांच्याकडून मिळालेल्या संख्येतून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -