ठरलं ! ‘या’ चित्रपटात दिसणार अमिर खान

आमिर खानने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. लवकरच तो एक रिमेक असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा करून चाहत्यांना रिटर्न गिफ्टच दिलं आहे.

Mumbai
aamir khan
आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज वाढदिवस. आपल्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. आमिरने नव्या चित्रपटाची घोषणा केलीये. आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत आमिरने नव्या चित्रपटाची घोषणा केली. त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘लाल सिंग चड्ढा’.

गेल्या वर्षी आलेला आमिरचा ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर आमिर आता कोणत्या चित्रपटात काम करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये होती. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. आमिरने त्याच्या पुढच्या चित्रपटाच नाव जाहीर केलं आहे.

कसा आहे ‘लाल सिंग चड्ढा’.

‘लाल सिंग चड्ढा’. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. १९९४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिर दिसणार आहे. आमिर या चित्रपटात सरदारजीच्या भुमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी अमिरला आपलं वजन कमी करावं लागणार आहे. लवकरच या चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. आमिरच्या कंपनीने या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आहेत.

सीक्रेट सुपस्टार या चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहे. आमिर नेहमीच आपल्या चित्रपटांसाठी मेहनत घेत असतो. त्याचा प्रत्येक चित्रपटाचा लूक हा खास असतो. आता या चित्रपटासाठी आमिर काय काय करणार, त्याचा लूक कसा असेल? हे लवकरच कळेल.