‘गर्लीयापा’ बोले तो स्त्रियांचा मुक्त संवाद

Mumbai
गर्लीयापा वाहिनी

छोट्या पडद्याने बाकी कमाल केली आहे. जसा प्रेक्षक तशा कार्यक्रमांची निर्मिती हा घाट सर्वच वाहिन्यांनी घातला होता. पण आता याच वाहिन्यांनी प्रेक्षकवर्ग अधिक मिळण्यासाठी पुढचा टप्पा गाठलेला आहे.जो महिलावर्ग विशेषत: दुपारच्या मालिका पाहण्यासाठी कामाची आवराआवर करून टीव्ही समोर बसत होता त्यांच्यासाठी ‘गर्लीयापा’ ही खास वाहिनी आहे. हॉस्टेलमध्ये राहणार्‍या महिलांचे भावविश्व उलगडून दाखवणारी ‘गर्ल्स हॉस्टेल’ ही मालिका कालपासून सुरू झालेली आहे. गर्लीयापा बोले तो स्त्रियांचा मुक्त संवाद.

बातम्या, कौटुंबीक विषय, पाकशास्त्र, गुन्हेगारी, युवा प्रेक्षक इतकेच काय तर इतिहास त्याचबरोबर लहान मुलांसाठी स्वतंत्र वाहिन्या सुरू झालेल्या आहेत. समोर बसलेल्या महिला प्रेक्षकांनी आजची जीवनशैली काय आहे हे जाणून घ्यावे हा या वाहिनीचा मुख्य उद्देश आहे. स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबीक, सामाजिक अशा अनेक समस्या आहेत. त्यावर त्यांना केवळ स्त्री असल्यामुळे मुक्तपणे बोलता येत नाहीत. लैंगिक, शारीरिक समस्यांवार स्त्रियांनी मुक्तपणे बोलावे असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कोणतीही स्त्री या विषयावर बोलण्यासाठी धजावत नाही. शहरीभागात याविषयाची थोडीफार जागृती झालेली आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया स्वत:ला चाचपताना दिसतात. गेल्या दोन वर्षांपासून ‘गर्लीयापा’ या वाहिनीच्या माध्यमातून हा सुसंवाद साधला जात आहे आणि स्त्रियाही आवर्जून यावर दाखवलेल्या मालिका पाहत आहेत.

‘गर्ल्स हॉस्टेल’ ही नवी मालिका कालपासून प्रक्षेपित करणे सुरू केलेले आहे. नोकरी, शिक्षण, कौटुंबीक समस्या यानिमित्ताने बर्‍याचशा स्त्रियांना हॉस्टेलमध्ये वास्तव्य करावे लागते. सांगायला या स्त्रिया असल्या तरी त्यांची वृत्ती-प्रवृत्ती ही प्रत्येकीची वेगळी असते. घरचे संस्कार, दिलेले अधिकार आणि आर्थिक रेलचेल यावर प्रत्येक स्त्रीचे जगणे हे अवलंबून असते. स्वत:ला सावरत असताना समाज जशी वागणूक देईल तसे तीचे हॉस्टेलमधील व हॉस्टेलबाहेरचे वागणे असते. एकत्र राहिल्यामुळे हॉस्टेलमधील स्त्रीची आजची सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थिती काय आहे हे मालिकेच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे.

गर्ल्स हॉस्टेलमधील चार युवतींची कथा अधोरेखीत केलेले आहे. सेंट जॉन्स् डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या युवतीची व्यक्तीरेखा चन्ना रिचा हीने साकार केलेली आहे. काही करण्याच्या उद्देश्याने अठरा वर्षांची एक मुलगी नागपूरवरून आलेली आहे. ती या हॉस्टेलमधे वास्तव्य करत आहे. सिमरन नाटेकरवर ही भूमिका सोपवलेली आहे. ती मूळची श्रीमंत असल्यामुळे तीचा वेगळा पैलू पहायला मिळेल. याशिवाय श्रीवास्तव ज्यो, पारूल गुलाटी यांच्या यात भूमिका असणार आहेत. मराठी रंगभूमीवर ‘ती तशीच होती’, ‘ठष्ट’ या नाटकांत हा विषय हाताळलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here