बघाच, ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठव्या सीझनची झलक

जगभरातील प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गेम ऑफ थ्रोन्स सीरीजचा शेवटचा सीझनबाबात महत्त्वाची बातमी...

Mumbai
game of thrones 8th season
आठव्या सीझनमध्ये जॉन स्नो आणि डैनेरियस टारगेरियन यांचे काय होणार?

एचबीओ वाहिनीवरील GOT म्हणजेच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या सीरीजचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. सर्वात जास्त पाहिली गेलेली सीरीज म्हणूनही जीओटीचा उल्लेख केला जातो. आतापर्यंत या सीरीजचे सात सिझन प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा आणि आठवा सिझन यावर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र २०१८ मध्ये आठवा सीझन प्रदर्शित न होता, तो २०१९ च्या मध्यात होईल, असे एचबीओतर्फे सांगण्यात येत आहे. नुकतंच एचबीओने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जीओटीसहीत इतर मालिकांची झलक त्यात पाहायला मिळत आहे. सध्या युट्यूब आणि ट्विटरवर अनेक चाहते या व्हिडिओला लाखो हिट्स देत आहेत.

जीओटीच्या प्रत्येक चाहता अगदी चातकाप्रमाणे या आठव्या सीझनची वाट पाहत आहे. एचबीओने सध्या रिलीजची तारीख सांगितली नसली तरी २०१९ च्या मध्यात जीओटी बघायला मिळू शकतो. त्याचे कारण असे की याच महिन्यात जीओटीने आपल्या आठव्या सीझनचे शुटिंग पुर्ण केले आहे.

जीओटीने प्रत्येक सीझनच्या नंतर चाहत्यांसमोर नवीन प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच प्रत्येकवेळी आता नव्या सीझनमध्ये काय? अशी उत्सुकता लागलेली असते. शेवटच्या सीझनबद्दल चाहते जरी अनेक अटकळी बांधत असले तरी एचबीओतर्फे कथानकाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. एचबीओचे प्रोग्रामिंग अध्यक्ष कॅसी ब्लोयस यांनी सांगितले की, “आठव्या सीझनबाबत काहीही लिक होऊ नये यासाठी वाढीव सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आलेली आहे.”

जीओटीमधे जॅमी लॅनिस्टर हे पात्र रंगवणारे कलाकार निकोलाज कोस्टर म्हणाले की, “यावेळी एचबीओ खुपच कठोर झाले आहे. कारण यावेळी उत्सुकताच इतकी शिगेला पोहोचली आहे की, चॅनेलला सुद्धा ती इनकॅश करायची आहे. आम्हाला शॉटच्या आधी हातात स्क्रिप्ट मिळत होती. तीही डिजीटल कॉपी. आमचा सीन संपताच ती स्क्रिप्ट डिलीट केली जायची. जसे की आम्ही मिशन इम्पॉसिबल सारखे काम करत आहोत.”

आठव्या सीझनमध्ये किती एपिसोड असणार?

सहाव्या सीझननंतर जीओटीचे फक्त १३ एपिसोड उरले होते. जे दोन सीझनमध्ये विभागण्यात आले होते. सातव्या सीझनमध्ये आठ एपिसोड होते, याचा अर्थ आठव्या सीझनमध्ये सहा एपिसोड असतील असं कळत आहे. एचबीओने सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओमध्ये जीओटीसोबत बिग लिटिल लाईज सीझन २, ट्रू डिटेक्टिव सीझन ३, बॅरी सीझन २, रुम १०४ सीझन २ आणि व्हिप्स अंतिम सीझन अशा काही सीरीजच्या झलक दाखवण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here