घरट्रेंडिंगगेम ऑफ थ्रोन्सचा ८वा सिझन येतोय; टीझर रिलीज

गेम ऑफ थ्रोन्सचा ८वा सिझन येतोय; टीझर रिलीज

Subscribe

गेम ऑफ थ्रोन्सच्या आठव्या सिझनची घोषणा...

संपुर्ण जगाला वेड लावणाऱ्या एचबीओच्या गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेच्या आठव्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. विलक्षण कल्पनेच्या कथानकावर आधारित या मालिकेचा शेवट असलेल्या आठव्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०१९ मध्ये हा भाग प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.

गेम ऑफ थ्रोन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक टीझरही रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये
#ForTheThrone अशा हॅशटॅग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे थ्रोनसाठी या भागात घमासान होणार याची सुतोवाच करण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक युद्ध, प्रत्येक विश्वासघात, प्रत्येक जोखीम, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक त्याग आणि प्रत्येक मृत्यू हा फक्त सिहांसनासाठी (#ForTheThrone) आहे. त्यामुळे आता GOT च्या चाहत्यांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहचली जाईल, यात शंकाच नाही.

- Advertisement -
‘गेम ऑफ थ्रोन्स’चं भारतीय कनेक्शन माहितेय?

गेम ऑफ थ्रोन्सच्या पहिल्या भागापासूनच या मालिकेला जगभरात तुफान प्रसिद्धी मिळालेली आहे. आतापर्यंत या मालिकेने ४६ एमी (Emmy) अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. तसेच २०१५, २०१६ आणि २०१८ साली उत्कृष्ट नाट्य मालिकेचा पुरस्कारही पटकावलेला आहे.

लेखक जॉर्ज आर. आर. मार्टिन यांनी गेम ऑफ थ्रोन्स ही कल्पनेवर आधारित कांदबरी लिहिलेली आहे. या कांदबरीवर आधारीतच ही मालिका एचबीओने प्रदर्शिक केली आहे. मार्टिन सध्या या कांदबरीच्या सहाव्या भागावर काम करत असून लवकरच तो भागही प्रकाशित करण्यात येणार आहे. या फॅटंसी मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांचे सवांद चाहत्यांना तोंडपाठ झाले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी काही घराणे जो युद्धाचा खेळ सुरु करतात, त्याचा शेवट आठव्या भागात दाखवण्यात येणार आहे. हे करत असताना त्यांना एका अनामिक संकटाचा सामना करायचा आहे, ज्याची उत्कंठा आता ताणली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -