डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार ‘ही’ प्रसिद्ध खेळाडू जोडी

'नच बलिए' या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सिजनमध्ये यंदा हटके थीम ठेवण्यात आली आहे.

Mumbai
Nach-Baliye-Season-9
नच बलिए - ९

‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोचा नववा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा या रिअॅलिटी शोमध्ये थोडी हटके थीम ठेवण्यात आली आहे. त्यानुसार या शोमध्ये स्पर्धक आपल्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराबरोबर डान्स करणार आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्रींनी या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र यंदाच्या सिजनमध्ये एक प्रसिद्ध खेळाडू जोडी नृत्याच्या तालावर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू गीता फोगट तिचा पती पवन कुमार सिंह सह ‘नच बलिए ९’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. गीताप्रमाणेच पवनकुमार सिंह सुद्धा प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. गीता आणि पवनप्रमाणेच या डान्स रिअॅलिटी शोमध्ये उर्वशी ढोलकीया, प्रिंस-युविका नरूला, रूबिना-अभिनव शुक्ला यांच्यासारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

अभिनेत्री जेनिफर विंगेट आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर ही जोडी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खान ‘नच बलिए ९’ चा निर्माता आहे. कुस्तीतील डावपेचांनी मैदान गाजवलेली गीता-पवनची जोडी डान्सचे मैदान मारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.