Kalank song: माधुरी- आलियाची अप्रतिम जुगलबंदी

Mumbai
Ghar More Pardesiya

बहुचर्चित ‘कलंक’ चित्रपाटाचं पहिलं-वहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘घर मोहे परदेसीया’ असे या गाण्याचे बोल असून, या गाण्यामध्ये माधुरी दिक्षीत आणि आलिया भट्ट यांच्या नृत्याची अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळते. या गाण्याला श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या सुंदर आवाजाची साज लाभली आहे. बॉलीवूडमधील सध्याची अघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आणि कमालीची नृत्यांगना माधुरी दिक्षीत यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतल्याचं चित्र दिसत आहे. युट्यूबसह सोशल मीडियावर या गाण्यावर लाईक्सचा प्रचंड पाऊस पडत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘कलंक’चा टिझर रिलीज झाला होता. टिझरमध्ये एकाहून एक कलाकारांची दमदार झलक पाहिल्यानंतर, चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती. अशातच आता या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे.

‘घर मोहे परदेसीया’ या गाण्यात अभिनेता वरुण धवनचीही झलक पाहायला मिळते. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकलेल्या आलियाने तिच्या कथ्थकनेही सगळ्यांना घायाळ केलं आहे. आलियाच्या दिलखेचक अदा आणि नृत्यावरील हुकुमत प्रेक्षकांना गाण्याच्या शेवटापर्यंत खिळवून ठेवते.  ‘कलंक’ चित्रपटात वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त असे एकाहून एक तगडे कलाकार आहेत. येत्या १७ एप्रिलला  हा कलंक प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.