घरमनोरंजन'घुमकेतू चित्रपट करताना बॉलीवूडमधील स्ट्रगलचे दिवस आठवले'

‘घुमकेतू चित्रपट करताना बॉलीवूडमधील स्ट्रगलचे दिवस आठवले’

Subscribe

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा घुमकेतू हा चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. झी ५ या अॅपवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट करताना आपल्याला बॉलीवूडमधील सुरूवातीचे स्ट्रगलिंगचे दिवस आठवले, अशी प्रतिक्रिया नवाजने या चित्रपटाबाबत दिली आहे. या चित्रपटात नवाज घुमकेतू नावाची व्यक्तिरेखा साकारत असून त्याला लेखक बनायचे आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यपदेखील या चित्रपटात अभिनय करताना दिसत आहेत. सोबत रघुबीर यादव, इला अरुण, स्वानंद किरकिरे यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – आर्थिक पॅकेज हा देशासोबत क्रूर विनोद – सोनिया गांधी

- Advertisement -

गँग ऑफ वासेपूर ठरला टर्निंग पॉईंट 

नवाजुद्दीन सिद्दीकीने दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. उत्तर प्रधेशच्या बुधाना जिल्ह्यातील नवाजने १९९९ साली चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारण्यास सुरूवात केली. २०१२ साली आलेल्या कहानी आणि गँग ऑफ वासेपूर चित्रपटांमधील भूमिकेमुळे नवाजची स्वतंत्र ओळख बॉलीवूडमध्ये बनली. त्यानंतर बदलापूर, किक, बजरंगी भाईजान, मंटो, सेक्रेड गेम्स सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमधील त्यांच्या व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या.

इतरांप्रमाणे मीदेखील एका छोट्याशा शहरातून मुंबईत मोठी स्वप्न घेऊन आलो होतो. सुरूवातील या शहरातील धावपळीशी स्वतःला जुळवून घेणं मलाही कठिण गेलं होतं. हळूहळू मी मुंबईत रूळू लागलो. मला बॉलीवूडमध्ये चांगली कामं मिळवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली. तशीच मेहनत या घुमकेतू चित्रपटातील लेखक बनू इच्छिणाऱ्या व्यक्तीला घ्यावी लागत आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला सुरूवातीचे ते दिवस आठवले, असे नवाजुद्दीनने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -