‘स्वरगंध’च्या वर्धापन दिन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

Mumbai
Swargandh

प्रतिनिधी:-‘स्वरगंध’ कलामंच या संस्थेने 29 व्या वर्धापन दिनानिमित्त ऐरोलीत दिग्गज कलाकारांनी एक संगीत, कला कार्यक्रम नुकताच सादर केला. यावेळी संगीतकार उदय-रामदास यांनी संगीत दिलेल्या स्वररचनांचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी स्वरगंधा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील उत्कृष्ट गीते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बासरी वादक अमित काकडे व तबला वादक उदय-रामदास यांच्या ताल स्वरांच्या जुगलबंदीने प्रेक्षक भारावून गेले. तर सारेगम फेम मृण्मयी फाटक यांच्या गाण्याने कार्यक्रमात रंगत आणली. त्याशिवाय गिटार वादक रितेश ओहळ, किबोर्ड वादक रोहित कुलकर्णी यांच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढली. संबळ वादक-हरिदास शिंदे आणि ढोलकी वादक-नागेश भोसेकर यांच्यातही कला जुगलबंदी रंगली. अस्मिता ठाकूर यांचे कथ्थक नृत्य, शिवाजी महाराजांचे गोंधळी यांचे वंशज असलेले हरदास शिंदे यांच्या गोंधळाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here