घरमनोरंजन'कपडे काढून आंदोलन केल्यामुळे खूप प्रतिसाद मिळाला'

‘कपडे काढून आंदोलन केल्यामुळे खूप प्रतिसाद मिळाला’

Subscribe

श्री रेड्डी हीने गैरवर्तन केल्याबद्दल तेलगू चित्रपट उद्योगातील राघव लॉरेन्स, नानी आणि कोराटाला शिवा यांच्यासारख्या मोठ्या नावावर आरोप केले होते.

तुम्हाला तेलगु अभिनेत्री श्री रेड्डी आठवतेय का? हो तीच जीने गेल्यावर्षी कास्टींग काऊचच्या विरोधात भररस्त्यात टॉपलेस झाली होते. रेड्डी ने टॉलिवूड मधील अनेक मोठ्या लोकांवर कास्टींग काऊचे आरोप लावले होते. यावेळी तीला बघायला रस्त्यात गर्दी जमली होती. पुन्हा एकदा श्री रेड्डी चर्चेत येणार आहे ते तीच्या फेसबुक पोस्टमुळे. मी टॉपलेस झाल्यामुळे मला जास्त प्रसिध्दी मिळाली अशी पोस्ट श्री रेड्डीने फेसबुकवर केली आहे.

- Advertisement -

काय आहे पोस्टमध्ये

मला कपडे काढल्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला.” पुढे तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उर्फ ​​केसीआर यांना पाठिंबा दिल्याबद्दल तीने त्यांचे आभार मानले आहेत. “आज मी  हैदराबादी असण्याचा मला अभिमान वाटतो.. धन्यवाद, तुम्ही माझे खरे गरू आहात. आज माझं स्वप्न सत्यात आलं. गेल्या वर्षभरापासून लैंगिक अत्याचार वाढले आहेत. सरकार या विरोधात कधी कारवाई करणार आहे. मी कपडे काढल्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

श्री रेड्डी हीने गैरवर्तन केल्याबद्दल तेलगू चित्रपट उद्योगातील राघव लॉरेन्स, नानी आणि कोराटाला शिवा यांच्यासारख्या मोठ्या नावावर आरोप केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -