अमिताभ – आयुषमान यांच्या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाचे Trailer Out!

Mumbai

बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या गुलाबो सिताबो चित्रपटाचा ट्रेलर आज सायंकाळी प्रदर्शित करण्यात आला आहे. लखनौच्या परिसरातील एका ७८ वर्षीय मुस्लिम घरमालकाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन पाहायला मिळत आहेत. तर आयुषमान खुराना हा त्यांचा भाडेकरू असल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ जून  रोजी प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. अमिताभ आणि आयुषमान यांची विनोदी ढंगाची नोकझोक प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे कलाकार अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांनी दिग्दर्शक सुजित सरकार यांच्यासोबत व्हिडिओ कॉलिंगवर ट्रेलर लाँचसंदर्भात चर्चा केली होती. ही चर्चादेखील युट्यूबवर शेअर करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयुषमान खुराना याने चित्रपटाबाबत बोलताना म्हटले होते की, गुलाबो सिताबो सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या सिनेमातून मी सुजित दासोबत पुन्हा एकदा काम करू शकलो. विकी डोनरनंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचा आनंद आहेच. याचबरोबर खूप दिवसांची इच्छा आणि स्वप्नही पूर्ण झालं कारण मी या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. मला आशा आहे की लोकांना आमची केमिस्ट्री नक्की आवडेल.

 

हेही वाचा –

बंगालनंतर ओडिशाला केंद्राची मदत, ५०० कोटी देण्याची पंतप्रधानांची घोषणा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here