घरमनोरंजनतरूणांमध्ये ‘गली बॉय’ची क्रेझ; लवकरच सिक्वल येणार!

तरूणांमध्ये ‘गली बॉय’ची क्रेझ; लवकरच सिक्वल येणार!

Subscribe

नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’ च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली असून त्याचा सिक्वल येण्याची शक्यता आहे.

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या चाहत्यांना ‘गली बॉय’ हा चित्रपट आवडला असेल तर, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल येण्याची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची दिग्दर्शिका खुद्द झोया अख्तरने या विषयीची माहिती दिली असून ‘गली बॉय’चा सिक्वल तयार करणार असल्याचे सांगितले. या चित्रपटात रणवीर-आलियाने आपापले कॅरेक्टर तसेच अभिनय उत्कृष्टरित्या केल्याने चाहत्यांसोबत चित्रपट समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

बॉक्स ऑफिसवर १०० करोड क्रोस

झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि रॅपर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपडणाऱ्या डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दिग्दर्शिका झोया अख्तरने ‘गली बॉय’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली होती. ज्यांना रॅप म्हणजे काय हे माहित नव्हतं त्यांना रॅप साँग या म्युझिक प्रकाराशी नव्याने ओळख झाली. अनेक चित्रपटांच्या स्पर्धेत बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत १०० करोडचा आकडा क्रोस केला.‘आपल्या देशातल्या हिप-हॉप संस्कृतीबद्दल अजून खूप काही सांगण्यासारखे आहे असे मला आणि माझी सहलेखिका रीमा कागदीला वाटते. त्यामुळे यावर आणखी सविस्तरपणे भाष्य करणारे चित्रपट आम्ही तुमच्या भेटीला आणू. त्याची कथा काय असेल यावर सध्या काम सुरू आहे, ’असे देखील झोया अख्तरने सांगितले.

- Advertisement -

मागील काही दिवसात असे अंदाज वर्तवले जात होता की, ‘गली बॉय’या चित्रपटाचा सिक्वल बनवला गेला तर त्यात फरहान अख्तरला कास्ट करण्यात येईल. परंतु हे अंदाज मोडीत काढत झोयाने असे सांगितले की, ” फरहान गली बॉयमध्ये फिट बसत नाही, याचे आम्हाला दुःख आहे. ‘रॉक ऑन’ या चित्रपटानंतर त्याची म्युझिकशी संबधित गायक म्हणून एक प्रतिमा तयार झाली होती. तो त्यातच योग्य दिसत होता. ”

- Advertisement -

रॅपर नावेद शेख यांच्यावर प्रेरित कथानक

रणवीरच्या करिअरमधील ‘गली बॉय’ हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’ च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली असून त्याचा सिक्वल येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -