घरमनोरंजनदिव्यांग कलाकारांनी भरले ’ नैन सुरीले’ त रंग

दिव्यांग कलाकारांनी भरले ’ नैन सुरीले’ त रंग

Subscribe

म.ल.डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले (पूर्व) येथील १९९१ सालच्या पदवीधर विद्यार्थ्यांचा १०६ जणांच्या ग्रुपने कै. शांताराम पाटील मेमोरियल ट्रस्टच्या सहकार्याने दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे नेत्रहीन मुलांची संस्था अरविंद कलायतनच्या ‘नैन सुरीले’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ आणि डॉ. श्रीकांत जिचकार फाऊंडेशनची झिरो ग्रॅव्हिटी या दोन छोट्या पण मदतीची तितकीच गरज असलेल्या संस्थांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी सादर केलेल्या कार्यक्रमात शिवाजी चव्हाण या वयाच्या सातव्या वर्षी अपघातात डावा पाय गमावणार्‍या कलाकाराने एका पायावर ‘नटरंग ’मराठी चित्रपटातले नृत्य सादर करून दाखवले.

- Advertisement -

ते नांदेडला शिक्षक म्हणून जवळपास ६० विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत आहेत. नृत्यानंतर दमून खुर्चीवर बसलेल्या शिवाजींना व त्यांच्या मातेला संपूर्ण सभागृहाने ऊभे राहून मानवंदना दिली. स्वत:ला ऐकू येत नसतानाही भरतनाट्यम शिकून त्या कलेद्वारे आपल्या नृत्यातून साक्षात वाग्देवी सरस्वतीला आवाहन करणारी कलाकारही आपला ठसा प्रेक्षकांवर उमटवून गेली. अनेक गुणी नेत्रहिन कलाकारांनी आपली कला सादर केली. त्याला उपस्थितांनी उत्तम दाद दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -