Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Birthday Special: 'या' चित्रपटातील अभिनयाने आणि लूकने हृतिकने केले इम्प्रेस

Birthday Special: ‘या’ चित्रपटातील अभिनयाने आणि लूकने हृतिकने केले इम्प्रेस

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या २० वर्षात हृतिकने आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांच्या मनात घरं केलं आहे. अनेक लोकं हृतिकाच्या अभिनयाचे वेडे नसून डान्स मुव्हसाठी वेडे आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्याच्या अशा चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात त्याने अभिनयाने आणि लूकने चाहत्यांना इम्प्रेस केले आहे.

कोई मिल गया

- Advertisement -

‘कोई मिल गया’ चित्रपटातील हृतिक रोशनची रोहित मेहरा भूमिका सगळ्यांना खूपच आवडली होती. हृतिकने या चित्रपटात मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या मुलाची भूमिका केली होती, ज्याला नंतर एक जादू नावाचा एलियन पॉवर देतो. हृतिकने या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला होता. त्यांचा शानदार अभिनय या चित्रपटात दिसून येतो.

- Advertisement -

लक्ष्य

हृतिकने ‘लक्ष्य’ चित्रपटात एक लष्करी अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेमुळे हृतिकचे फारच कौतुक झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरने केले होते.

जोधा अकबर

मुघल सम्राट अकबर व हिंदू राजपूत युवराज्ञी जोधाबाई ह्यांच्या प्रेमकथेवर आधारित ‘जोधा अकबर’ चित्रपटात हृतिकने अकबराची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेमुळे पुन्हा एकदा हृतिक चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला.

गुजारिश

‘गुजारिश’ या चित्रपटात हृतिने एक अर्धांगवायू झालेल्या जादूगाराची भूमिका केली होती. हा जादूगार आपले आयुष्य संपवू इच्छित असतो. या चित्रपटासाठी हृतिकने आपले वजन वाढवले होते. हृतिकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही, पण ट्रांसफॉर्मेशन आणि अभिनयासाठी हृतिकचे खूप कौतुक होत होते.

क्रिश

‘कोई मिल गया’ चित्रपटाचा सीक्वल ‘क्रिश’ हा चित्रपट आला. यामध्ये हृतिकने एका सुपरहिरोची भूमिका केली होती. या चित्रपटातील लूक चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला होता. तसेच यामधील स्टंटमुळे हृतिक चांगलाच चर्चेत आला होता.

सुपर ३०

काही काळानंतर हृतिकने आपला अभियन कौशल्य चित्रपट ‘सुपर ३०’मध्ये दाखवून दिले. या चित्रपटात त्याने गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी हृतिकने बिहारी एक्सेंटसाठी खूप मेहनत घेतली होती.


हेही वाचा – Photo: हॅपी बर्ड डे ऋतिक रोशन


 

- Advertisement -