घरमनोरंजनVideo: पुजा सावंतला 'या' अभिनेत्रीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Video: पुजा सावंतला ‘या’ अभिनेत्रीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Subscribe

मराठी चित्रपटपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री पुजा सावंतचा आज वाढदिवस. पुजावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलेब्रेटींनी पुजाबरोबरचा फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुजाला दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

 

सोनालीने पुजाबरोबरचा एक डान्स व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सोनाली आणि पुजा डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खुप आवडला आहे. हा व्हिडीओ अभिनेता भुषण प्रधानने काढला आहे. प्रार्थना बेहरेने दिलेल्या पार्टीतला हा व्हिडीओ आहे. या व्हीडीओमधील सोनाली आमि पुजाने सुरेख डान्स केला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेले काही फोटो. पूजाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील पूजाच्या बोल्ड लूकवर सेलिब्रिटीसुद्धा फिदा झाले आहेत.

पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिने केलेल्या उत्कृष्ट अभिनयानंतर तिच्या वाट्याला अनेक दर्जेदार भूमिका आल्या.’आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -