‘चालतयं की’ म्हणणारा राणादा मालिकेतून घेणार एक्झिट?

राणादाची भूमिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Mumbai

झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यासोबतच या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे अंजली अर्थात सर्वांची लाडकी पाठक बाई आणि राणादा या दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. मात्र या मालिकेसंदर्भात वेगळ्याच चर्चा रंगताना दिसत आहे. कारण या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार असून मालिकेच्या सेटवरील काही फोटो लिक झाल्यानंतर या मालिकेविषयी जोरदार चर्चा होतांना दिसतेय.

कोणत्याही संकटाला बिनधास्त सामोरे जाणारा राणादा एका मोठ्या संकटात अडकल्याचे समजत आहे. काही लिक झालेल्या काही फोटोमुळे राणादाचा मालिकेत मृत्यू होणार असल्याची चर्चा रंगतेय. जर असेच झाले तर राणादाचे पात्र पुन्हा मालिकेत दिसणार की नाही. या पात्राचा मालिकेतील प्रवास इथेच थांबणार का? यासोबतच, नुकताच मालिकेत एक फाईट सीन शूट झाला असून त्यावेळी राणादाला बेदम मारण्यात आले. यानंतर राणादा म्हणजेच हार्दिक जोशी शुटिंग संपवून मुंबईत परतला. त्यामुळे राणादा मालिकेमधून एक्झिट घेणार असल्याची चर्चा देखील तेवढीच रंगली आहे.

त्यामुळे या पात्राचा मालिकेतील प्रवास संपला की हार्दिक जोशीने मालिका सोडली हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र राणादाने म्हणजेच हार्दिकने जर मालिका सोडली तर त्याच्या चाहत्यांचा हिरमोड होईल हे मात्र नक्की..

राणादा आणि पाठक बाई यांची मालिकेतील कॅमेस्ट्री सुरूवातीपासून सुपरहिट असल्याने प्रेक्षकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यामुळे जर राणादाची या मालिकेतून एक्झिट झालीच तर त्या जागी नवा कोणता अभिनेता त्याची जागा घेईल याकरिता प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागाची वाट पहावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here