Video: हिनाच्या ‘या’ हॉट डान्सवर नेटकरी फिदा

हिना पांचाळचा हा हॉट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिनाच्या या डान्स व्हिडिओवर नेटकरी घायाळ झाले आहे.

Mumbai
heena panchal share hot dance video on instagram
हिना पांचाळ

मराठीतील मलायका अरोरा म्हणून ओळख असलेली मराठी ‘बिग बॉस सिझन २’ मधील हिना पांचाळ सध्या सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते. चाहत्यांसाठी हिना नेहमी तिचे डान्स व्हिडिओ किंवा टिक-टॉक व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचा एक हॉट डान्स व्हिडिओ चर्चेत आला आहे. या डान्स व्हिडिओ मध्ये तिने शकिराच्या ‘हिप्स डोंट लाय’ या गाणावर आपली वेगळी अदा दाखवली आहे. तिच्या या व्हिडिओवरून सध्या ती गोव्यामध्ये असल्याचं समजतं आहे. नुकतचं तिचं पंजाबी गाणं प्रदर्शित झालं होत. सध्या चर्चे असलेले हिना पांचाळचा हा हॉट डान्स व्हिडिओ पाहा.

‘बिग बॉस सिझन २’ मध्ये हिनाने तिच्या बोल्ड आणि मादक अदाने तसंच डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हिनाने वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बिग बॉसच्या घरात सतत गोंधळणारी हिना भलताच भाव खाऊन गेली. शिव ठाकरे आणि विना जगताप या दोघांशी तिची चांगलीच गट्टी झाली. घराबाहेर देखील त्यांची ही मैत्री दिसून येत आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हिनाने आपल्या चाहत्यांसाठी तिचे डान्स व्हिडिओ शेअर केले जातील हे तिने सांगितलं होत. त्यामुळे ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी डान्स व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. बिग बॉसचे दुसरं पर्व जरी संपलं असलं तरी अजूनही हिनाची चर्चा सुरू आहे.

२०१४ साली हिनाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यास सुरुवात केली. मात्र तिला अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केले आहेत. २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटीच्या यादीत हिनाचा समावेश होता.

View this post on Instagram

@abhishek__giri amazing leader .thanks

A post shared by Heena M Panchal (@theofficialheena) on


हेही वाचा – Video : ज्या गाण्याने ओळख दिली तेच गाणं राणू विसरली!