Hema Malini Birthday Special: हेमा मालिनी धर्मेंद्र नाही तर जितेंद्रच्या सौ होणार होत्या, पण

Hema Malini Birthday Special hema malini birthday here actress love story with dharmendra
Hema Malini Birthday Special: हेमा मालिनी धर्मेंद्र नाही तर जितेंद्रच्या सौ होणार होत्या, पण

ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस आहे. हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्यांनी १९६८ मध्ये ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हेमा मालिनी यांच्या सुंदरतेने अनेकांची मने जिंकली. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांशी त्यांचे नाव जोडले होते. अखेर त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले.

हेमा मालिक यांना अकरावीमध्ये असल्यापासूनच चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. १९७४ दरम्यान फक्त धर्मेंद्र नाही तर अनेक दिग्गज अभिनेते हेमा मालिनींच्या प्रेमात पडले होते. यामधील दोन अभिनेत्याचे नाव होते संजीव कुमार आणि जितेंद्र.

संजीव कुमार यांचे हेमा मालिनींवर मनापासून प्रेम करत होते. एवढेच नाहीतर संजीव कुमार यांनी आपल्या आई-वडिलांना हेमा मालिनी यांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवले होते. त्यावेळेस हेमा मालिनींच्या आईने मुलीचे लग्न करण्याचे वय नसल्याचे सांगून लग्नास नकार दिला होता. त्यानंतर संजीव कुमार यांनी त्यांचा मित्र जितेंद्रला लग्नाचा प्रस्ताव घेऊन हेमा मालिनींच्या घरी पाठवले. त्यावेळेस हेमा मालिनी यांनी संजीव त्यांना आवडत असून त्यांच्याशी लग्न करू शकत नाही, असे स्पष्टपणे जितेंद्र यांना सांगितले. हेमा मालिनी यांचा नकार ऐकून संजीव कुमार खूप दुःखी झाले होते. वृत्तानुसार, या दुःखात संजीव कुमार खूप दारू पिऊ लागले. यामुळे त्याची प्रकृती खराब होऊ लागली.

संजीव कुमार यांना नकार दिल्यानंतर हेमा मालिनी आणि जितेंद्र यांच्यातील जवळीक वाढू लागली. जितेंद्र देखील हेमा मालिनी यांच्यावर प्रेम करू लागले. एके दिवशी हेमा मालिनी यांना जितेंद्र यांनी प्रपोज केले. ‘दुल्हन’ चित्रपटाच्या दरम्यान जितेंद्र आणि हेमा यांनी बराच वेळ एकत्र घालवला. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर जितेंद्र आपल्या आई-वडिलांना घेऊन हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचले. दोघांचे घरचे सदस्य एकमेकांशी बातचित करत होते. त्यावेळेस हेमा यांना धर्मेंद्र यांचा फोन आला. धर्मेंद यांनी हेमा यांना सांगितले की, ‘कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मला भेट.’

पण जितेंद्र यांनी हेमाचा निर्णय बदलू नये म्हणून त्यांनी त्याच दिवशी तिरुपती मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हेमा मालिनी पुन्हा फोन वाजेल अशा विचारत होत्या. पण त्यावेळेस जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा यांचा फोन आला. त्यांनी जितेंद्र यांना आपल्या प्रेमापोटी लग्न न करण्यास सांगितले. त्यानंतर जितेंद्र हेमा मालिनीसोबत लग्न करू शकले नाही. मग १९७६मध्ये जितेंद्र यांनी शोभा यांच्यासोबत लग्न केले.

हेमा मालिनी यांच्या वडिलांना धर्मेंद्र यांच्यासोबत हेमा यांचे नाते मान्य नव्हते. धर्मेंद्र विवाहित असल्यामुळे हेमा मालिनी आणि त्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत होते. १९७६ साली एका मॅगजीनमध्ये दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘धर्मेंद्र यांची पत्नी प्रकाश कौर या मला खूप आवडतात, पण मी धर्मेंद्र शिवाय राहू शकत नाही.’ प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना तलाक देण्यास नकार दिला होता. माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्विकारत हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले.


हेही वाचा – सुप्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह