हेरा फेरी ३ ची तयारी सुरू, अक्षय,परेश आणि सुनील शेट्टीची धम्माल

हेरा फेरी हा चित्रपट पुन्हा एकदा नव्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेरा फेरी या चित्रपटाचं नुसत नाव जरी ऐकलं तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येत. कारण या चित्रपटाने सुपर डुपर रेकॉर्ड करत प्रेक्षकांना हसवून वेड केलं होतं. आता पुन्हा याच चित्रपटातल अक्षय,परेश आणि सुनील शेट्टी यांच त्रिकुट हेरा फेरी ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सुनील शेट्टीने नुकताच यास दुजोरा दिला असून आम्ही तिघ पुन्हा एकदा हेरा फेरी ३ मधून येत आहोत असे सांगितले आहे.

हेरा फेरी चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश; डोक्यावर घेतल होते. त्यामुळे प्रेक्षकांचा हा उत्साह बघून चित्रपाटाचा सिक्वल फिर हेरा फेरीची निर्मिती करण्यात आली होती. त्यातही अक्षय, परेश आणि सुनील यांनी धम्माल उडवली. या सिक्वललाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा या तिघांना एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामुळे हेरा फेरी 3 ची निर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण यात अक्षयच्या ऐवजी जॉन अब्राहम किंवा अभिषेक बच्चन चमकणार असेही बोलले जात होते. मात्र यात अक्षयच असेल असे सांगत सुनील शेट्टीने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.