घरमनोरंजन'हाय रेटेड गबरू' वरूण

‘हाय रेटेड गबरू’ वरूण

Subscribe

'हाय रेटेड गबरू' वरूण आणि श्रद्धा पुन्हा एकदा गाण्यामध्ये नवा अंदाज घेऊन आले आहेत. 'नवाबजादे' चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

पंजाबी गायक गुरु रंधावाचं ‘हाय रेटेड गबरू’ हे अचानक गुरुवारी सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागलं. याचं कारण आहे ते म्हणजे हे गाणं नव्या अंदाजात वरुण धवन आणि श्रद्धा कपूर रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘नवाबझादे’मधून घेऊन आले आहेत. मागील वर्षी या जोडीनं हे गाणं मुंबईच्या एका स्टुडिओमध्ये शूट केलं होतं. ज्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला असून ट्रेंडिंगमध्ये आला आहे. तर या दोघांबरोबर ‘एबीसीडी २’ चे सह – कलाकार धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत पाठकदेखील या व्हिडिओत आहेत.

गुरु रंधावाचं प्रसिद्ध गाणं

‘हाय रेटेड गबरू’ हे गाणं प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि आता दिग्दर्शनाकडे वळलेल्या रेमो डिसुझाच्या ‘नवाबजादे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात धर्मेश येलांडे, राघव जुयाल आणि पुनीत पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या या गाण्यात वरूण आणि श्रद्धा आपला जलवा दाखवताना दिसत आहेत. या चित्रपटांचा निर्माता रेमो डिसुझा असून जयेश प्रधाननं याचं दिग्दर्शन केलं आहे. या व्हिडिओमध्ये सर्व कलाकारांचा स्वॅग दिसून येत आहे. हे गाणं गुरु रंधावानं लिहिलं असून आधीपासूनच प्रसिद्ध आहे. या गाण्यासंदर्भात ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत वरूण धवननं सांगितलं, ‘राघव, पुनीत आणि धर्मेश हे तिघेही अतिशय टॅलेंटेड आहेत. तर पुन्हा एकदा श्रद्धाबरोबर स्क्रिन शेअर करून खूपच मजा आली.’ हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधीदेखील गुरुनं गायलेली पंजाबी गाणी बॉलीवूडमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहेत. या गाण्यानंदेखील कमी कालावधीत ४ लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -