घरमनोरंजनकलर्सची होळी

कलर्सची होळी

Subscribe

कौटुंबिक मालिका कोणत्याही वाहिनीची असो, प्रत्येक वाहिनीने सण-उत्सवांचे महत्त्व लक्षात घेऊन कथासूत्रात त्याचे दर्शन कसे घडेल हे पाहिलेले आहे. त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीनेसुद्धा तशी तयारी केलेली आहे. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून ’, ‘नवरा असावा तर असा’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या गाजलेल्या मालिकांमध्ये होळी आणि रंगपंचमी याचे दर्शन निदान आठवडाभर घडेल असे पाहिलेले आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं यातसुद्धा होळी विशेष काही वेगळे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे.

सण-उत्सवांना महत्त्व देताना सुरूअसलेल्या कथेला बाधा येणार नाही याची दिग्दर्शकाने काळजी घेतलेली आहे. बर्‍याचशा कथांमध्ये या उत्सवाच्या निमित्ताने उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ मध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य पुढे आलेले आहे, त्यामुळे घरात चिडचिड वाढलेली आहे. महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी सर्वात जास्त उत्साहाने कोणत्या समाजात साजरी केली जात असेल तर ती आगरी-कोळी समाजामध्ये. ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमाने खास वरळी-कोळीवाडा गाजलेला आहे. ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत अबोलीचे कारस्थान उघडे पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -