घरमनोरंजनभारतात प्रदर्शनापुर्वीच लीक झाला 'एवेंजर्स: एंडगेम'

भारतात प्रदर्शनापुर्वीच लीक झाला ‘एवेंजर्स: एंडगेम’

Subscribe

TamilRockers या नावाच्या वेबसाईटवर संपुर्ण चित्रपट लीक झाला आहे

‘एवेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटाच्या सिरीजचा शेवटचा भाग येणाऱ्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. परंतु हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शनापुर्वीच लीक झाल्याचे कळते आहे. TamilRockers नावाच्या वेबसाईटवर संपुर्ण चित्रपट लीक झाला आहे. २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट टोरंटच्या काही वेबसाईटवर लीक झाल्याने चित्रपटाच्या कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो हे नाकारता येत नाही.

मार्वल स्टूडिओजची निर्मिती

कॅप्टन मार्वेलच्या एवेंजर सिरीजमधील ‘कॅप्टन अमेरिका द फस्ट एवेंजर्स’ या एवेंजर्स पासून सुरुवात झालेल्या या प्रवासात एवेंजर्स सिरिजच्या द एंडगेम या भागात देखील कप्टन अमेरिका या एवेंजर्सला हायलाईट करण्यात आले आहे. थोर, हॉक आय, ब्लॅक विडो, हल्क या एवेंजर्सचा प्रत्येकाचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. भारतात या चित्रपटाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. २०१२ साला पासून एवेंजर्स सिरीजला सुरवात झाली. मार्वल स्टूडिओजने या सिरीजची निर्मिती केली आहे. एवेंजर्स एंडगेम हा या सिरीज मधील शेवटचा भाग ठरणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

पायरेटेड कॉपी भारतातही उपलब्ध

‘एवेंजर्स: एंडगेम’ दोन दिवसांनंतर भारतात प्रदर्शित होणार असून आज हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाला. चीनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याची पायरेटेड कॉपी भारतातही उपलब्ध झाली. त्यामुळे हा चित्रपट लीक करण्यात आला. इंटरनेटवर या चित्रपटाची लिंक ओपन केली तर त्याचे नाव इंग्लिशमध्ये, सबटायटल हिंदी भाषेत दिसते. यावरून हे सिद्ध होते की हा चित्रपट तिथून लीक झाला आहे.

 

चित्रपटाचे शोज २४ तास सुरू

‘एवेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटाचा हा शेवटचा भाग असल्याने चाहते, प्रेक्षक या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत होते. तसेच या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने या चित्रपटाचे शोज २४ तास सुरू ठेवण्याची ही परवानगी मिळाली आहे.

TamilRockers या वेबसाईटवर हा चित्रपट उपलब्ध असल्याचे स्क्रीनशॉट्स काही चित्रपटप्रेमींनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. TamilRockers या वेबसाईटवर या आधीही चांगले लीक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तसेच, ‘एवेंजर्स: एंडगेम’ या हॉलिवूडपटाआधी तमीळ रॉकर्स वेबसाईटने हॉलिवूड, बॉलिवूड आणि दक्षिणेतील इतरही अनेक चित्रपट लीक केले होते. ही वेबसाइट चालवणाऱ्या काही लोकांना २०१८मध्ये अटक करण्यात आले होते. तरीही या वेबसाइटवरून चित्रपट लीक होत आहेत. तमीळ रॉकर्स ही वेबसाईट सरकारकडून अनेकदा ब्लॉक करण्यात आली होती. पण प्रत्येकवेळी नवीन डोमेन आणि आईपीसोबत ही वेबसाइट परत चित्रपट लीक करत असते.

दहा लाख तिकीटांची विक्री

‘एवेंजर्स: एंडगेम’ या चित्रपटाच्या तिकीट विक्रीच्या बाबतीत ही अनोखा विक्रम रचला आहे. बुक माय शोवर एकाच दिवशी या चित्रपटाचे १० लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. प्रती सेकंदास १८ तिकीट बुक प्रेक्षकांकडून होत होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -