‘दयाबेन’च्या आधीच होणार ‘या’ स्टारची ‘तारक मेहता’ मध्ये एन्ट्री!

प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या दयाबेनची या मालिकेत एन्ट्री न होता, एका नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे. हा नवा चेहरा दूसरा कोणी नसून हॉलिवूड अभिनेता कल पेन आहे.

Mumbai

तारक मेहता ही मालिका काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीच्या परण्याची जोरदार चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये होताना दिसत आहे. या मालिकेचे प्रेक्षक मालिकेत दयाबेनच्या परतण्याची वाट पाहत आहेत. मात्र आता एक वेगळीच बातमी समोर येताना दिसतेय ती अशी की, प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या दयाबेनची या मालिकेत एन्ट्री न होता, एका नव्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे. हा नवा चेहरा दूसरा कोणी नसून हॉलिवूड अभिनेता कल पेन आहे.

मुळात भारतीय असणारा अमेरिकन अभिनेता कल पेनने नुकतीच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर मालिकेत काम करण्याबाबत ईच्छा व्यक्त केली आहे. गुजराती कुटुंबातील कल पेन असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतोय. त्यात हा आभिनेता गुजराती भाषेत बोलताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत कल पेन स्वतःला लेडीज भाई असे बोलत तो गुजराती भाषेत डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडिया युजर्सने कल पेनला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्याचा सल्ला देण्यास सुरूवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

I’m standing on a table to promote my new show! @nbcsunnyside Thursday nights 9:30pm this fall on @nbc ☀️

A post shared by Kal Penn (@kalpenn) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here