घरमनोरंजनरिया चक्रवर्तीचे 'ते' तुरुंगातील दिवस कसे गेले; वकिलांनी केला खुलासा

रिया चक्रवर्तीचे ‘ते’ तुरुंगातील दिवस कसे गेले; वकिलांनी केला खुलासा

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी कथित आरोपी असलेली रिया चक्रवर्ती गेल्या २८ दिवसांपासून ड्रग्ज कनेक्शनच्या आरोपाखाली भायखळा तुरूंगात होती. काल, बुधवारी रियाला जामीन मंजूर झाला असून तिची कारागृहातून सुटका करण्यात आली. मुंबई हायकोर्टाने रियाला सर्शत जामीन मंजूर केला असला तरी तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या २८ दिवसात रियाने काय काय केले याचा खुलासा तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केला आहे. तुरुंगात टिकून राहण्यासाठी रियाने योगाची मदत घेतली असून तिने दुसऱ्या कैद्यांसाठीही योगाचे वर्ग घेतले असल्याचे त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. रियाला बँगॉल टायगर अशी उपाधी यांनी दिली आहे.

काय म्हणाले रियाचे वकील 

तुरुंगात असताना रियाने स्वत:ला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला, असे सतीश मानशिंदे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी तिचा बराच पिच्छा पुरवला होता. त्यामुळेच बऱ्याच वर्षांनी मी माझ्या अशीलाला पाहण्यासाठी तुरुंगात गेलो. ती कुठल्या स्थितीमध्ये आहे, ते मला पाहायचे होते. मी तिला पाहिले, तिने हिंमत हरलेली नव्हती. तुरुंगात ती स्वत:ची काळजी घेत होती. ती स्वत:साठी आणि इतर कैद्यांसाठी तुरुंगात योगाचे वर्ग घ्यायची. तुरुंगातल्या परिस्थितीशी तिने जुळवून घेतले होते. करोनामुळे तिला घरात बनवलेले जेवण मिळत नव्हते. सामान्य माणसाप्रमाणे ती इतर कैद्यांसोबत राहत होती. परिस्थितीशी तिने लढा दिला. तिच्यावर आरोप करणाऱ्या किंवा तिच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या कोणाचाही सामना करण्यास ती आता सज्ज आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पालकांचे आर्थिक शोषण करणार्‍या शाळांवर होणार कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -