Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ऋतिक रोशनची ओटीटीवर एंट्री, जुनी मैत्रिण करतेय निर्मिती

ऋतिक रोशनची ओटीटीवर एंट्री, जुनी मैत्रिण करतेय निर्मिती

ऋतिक नव्या सिनेमासह ओटीटीवर दमदार एंट्री करणार आहे. 'द नाइट मॅनेजर' या नव्या वेबसिरीजमधून ऋतिक प्रेक्षकांना दिसणार आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता ऋतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऋतिक आता ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे. ऋतिक नव्या सिनेमासह ओटीटीवर दमदार एंट्री करणार आहे. ‘द नाइट मॅनेजर’ या नव्या वेबसिरीजमधून ऋतिक प्रेक्षकांना दिसणार आहे. या वेबसिरिजचे वैशिष्ट्य म्हणजे याची निर्मिती अभिनेत्री प्रिती झिंटा हिने केली आहे. ऋतिक आणि प्रिती अनेक वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून ऋतिकच्या या वेब सिरिजची चर्चा सुरू आहे. ही वेबसिरिज अभिनेत्री प्रिती झिंटा हिने प्रोड्यूस करणार आहे. ऋतिक आणि प्रिती अनेक वर्षांनंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. कोई मिल गया या सिनेमातून ऋतिक आणि प्रिती झिंटाने एकत्र काम केले होते. बऱ्याच वर्षानंतर ऋतिक आणि प्रिती यांनी एकत्र काम केले आहे. सारसी जॉन ले कॅरे नावेल यांचा द नाईट मॅनेजर हा हिंदी रिमेक असणार आहे. ही वेबसिरिज अभिनेत्री प्रिती झिंटा प्रोड्युस करत आहे. संदीप मोदी याने वेबसिरिजचे दिग्दर्शन केले आहे. ऋतिक रोशन हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिती झिंटाला या वेबसिरिजसाठी ऋतिक रोशन अगदी योग्य वाटला. प्रितीच्या ऑफर नंतर ऋतिकनेही या प्रोजेक्टसाठी लगेचच हो म्हटले. डिजिटल डेब्यूसाठी ऋतिकचा चेहरा अगदी योग्य आहे. या वेब सिरिजसाठी ऋतिक शिवाय दुसरा कोणताच अभिनेता परफेक्ट नाही, असे प्रिती झिंटा म्हणाली.


- Advertisement -

हेही वाचा – अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBचा समन्स

- Advertisement -