महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण यांचे १४ नोव्हेंबरला निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर पटणा येथे उपचार सुरू होते. नारायण यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच अभिनेता हृतिक रोशननंही दुःख व्यक्त केलंय.
वशिष्ठ यांची भारताचे स्टिफन हॉकिंग म्हणून ओळख होती. नारायण यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. हृतिकने ट्विट करत वशिष्ठ नारायण यांच्या निधनावर दुख: व्यक्त केले.
Not many people know that yesterday we lost one of the biggest mathematicians that India produced in modern era. Vashishtha Narayan Singh, born in a village in Bihar, solved some of the most difficult equations of mathematics. Deeply saddened by his demise. https://t.co/uYL1mYhzrJ
— Hrithik Roshan (@iHrithik) November 15, 2019
‘अनेकांना माहिती नाहीये की आपण किती मोठ्या गणितज्ञांना गमावलंय, वशिष्ठ नारायण सिंह यांचा बिहारमधील एका छोट्याशा गावात जन्म झालाय. त्यांनी कित्येक अवघड गणितं सोडवली आहेत.’ असं ट्विट हृतिकनं केलंय.
वशिष्ठ यांनी नासा आणि कॅलिफॉर्निया विद्यापीठात काम केलंय. वशिष्ठ यांची गुरुवारी तब्येत बिघडल्यामुळं पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं जवळपास एक तास वशिष्ठ यांचा मृतदेह रुग्णालयाबाहेरच असल्याचं समोर आलं आहे.