हॉलिवूडमध्ये अभिनेता हृतिक रोशन करणार पदार्पण!

हृतिकच्या चाहत्यांसाठी एक सुखद बाातमी आहे

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासून सुरु झालेला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन प्रवास आता वीस वर्षांचा झाला आहे. या वीस वर्षात त्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. यात कहो ना प्यार है, क्रिश, फिशन कश्मीर, जिंदगी मिलेगी ना दोबारा, बॅंग बॅंग, लक्ष्य आदी अनेक सिनेमांचा समवेश होतो. आता त्या पलिकडे जाऊन हा भारतीय अभिनेता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

हॉलिवूडपटात एका गुप्तहेराच्या भूमिकेसाठी हृतिकने ऑडिशन दिली असून हृतिकची शरीरयष्टी पाहून त्याच्या अॅक्शनमुळे त्याला या चित्रपटात घेण्याचा विचार हॉलिवूडवाले करत आहेत. लॉकडाऊन दरम्यान हृतिकने ही ऑडिशन दिली आहे. याशिवाय, हॉलिवूडवाल्यांना ही ऑडिशन आवडली असल्याचे देखील सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी जर हृतिकची निवड झाली तर पुढच्या वर्षी हृतिकला काही दिवस या चित्रपटासाठी द्यावे लागतील. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांसाठी ही सुखद बाातमी आहे. त्याच्या काही चित्रपटांमधून त्याने केलेला अॅक्शन सिक्वेन्स लक्षात घेऊन त्याचा विचार केला असल्याची शक्यता आहे. मात्र आता हा चित्रपट त्याला मिळतो की नाही. यासाठी त्याच्या चाहत्यांना वाट पाहवी लागणार आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिक रोशनने अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी घेतली. ही टॅलेंट एजन्सी हृतिक रोशनला हॉलिवूडमध्ये प्रमोट करणार आहे. तब्बल ८ महिन्यांनंतर हृतिकला हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हृतिक लवकरच आपल्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे.


बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी NCB चा छापा, ड्रायव्हर ताब्यात