घरट्रेंडिंगइंटिमेट सीन्सचे दिग्दर्शन का होत नाही - कल्की कोचलीन

इंटिमेट सीन्सचे दिग्दर्शन का होत नाही – कल्की कोचलीन

Subscribe

अभिनेत्रींना इंटिमेट सीन्ससाठी एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचे अभिनेत्री कल्की कोचलीन हीने सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान प्रतिक्रिया देतांना तिने व्यक्तव्य केले.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीने इंटिमेट सीन्सबद्दल वक्तव्य केले आहे. चित्रपटात इंटिमेट सीन्स शिवाय चित्रपट चालणे अवघड असल्याचे तिने सांगितले आहे. असे सीन्स चित्रपट व्यवसायात वापरणे उपयोगी आहेत. हे सीन्स करतांना अभिनेत्रींना समोरच्या व्यक्तीवर विश्वास असणे आवश्यक आहे. काही कलाकारांना कधीही न भेटताही तिने त्यांच्यासोबत असे सीन्स केले असल्याचेही कल्कीने सांगितले. कल्की कोचलीन हीने देव डी, जिंदगी ना मिलेगी दोबारा, ये जवानी है दिवानी, शैतान आणि शैंघाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटात काम करत असतांना तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.

- Advertisement -

काय म्हणाली कल्की

जेव्हा आम्ही चित्रपटाच्या सेटवर असतो तेव्हा दिग्दर्शित केलेले एॅक्शन सीन्स देखील करण्यासाठी कलाकार घाबरतात. कोणताही व्यक्ती चुकूनही कलाकाराच्या चेहेऱ्यावर पंच नाही करत. एॅक्शन सीन्ससाठी खूप काळजी घेतली जाते तर इंंटिमेट सीन्ससाठी का नाही? या सीन्समध्ये आपण कधीही न भेटलेल्या माणसाचे चुंबन घेतो यासाठी समोरच्यावर विश्वास असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

#metoo बद्दल ही केले होते वक्तव्य

कल्कीने ‘टाटा लिटरेचर लाईव्ह’ या कार्यक्रमादरम्यान ही प्रतिक्रिया दिली. #metoo मोहीमेबद्दलही कल्कीने यापूर्वी वक्तव्य केले होते. #metoo मोहीम ही बॉलिवूडमध्ये असलेल्या एका हिरो सारखी असल्याचे तिने सांगितले होते. #metoo मोहीम मीडियामध्ये दाखवल्या जाते त्याहून अधिक असल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -