घरमनोरंजनआघाडीच्या अभिनेत्रींनाही लाजवतील ६० वर्षीय अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

आघाडीच्या अभिनेत्रींनाही लाजवतील ६० वर्षीय अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

Subscribe

प्रियांका चोप्रा, कटरिना कैफ, सोनम कपूर या अभिनेत्रींना अभिनयाबरोबरच त्यांच्या ग्लॅमरस लुकसाठी सुद्धा ओळखण्यात येते. पण या सर्वांना सध्या टक्कर देतेय ती बॉलीवूडची वय वर्ष ६० असणारी अभिनेत्री.

प्रियांका चोप्रा, कटरिना कैफ, सोनम कपूर या अभिनेत्रींना अभिनयाबरोबरच त्यांच्या ग्लॅमरस लुकसाठी सुद्धा ओळखण्यात येते. पण या सर्वांना सध्या टक्कर देतेय ती बॉलीवूडची वय वर्ष ६० असणारी अभिनेत्री. तिचे नाव आहे नीना गुप्ता. ६०व्या वर्षीसुद्धा नीना गुप्ता तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नीना गुप्ता त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. नुकताच नीना यांनी एका फ्रॉकमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नीना यांचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

View this post on Instagram

Frock ka shock. Picture taken by the gajraj sir

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

- Advertisement -

नीना गुप्ता यांनी फोटोमध्ये यलो कलरचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला आहे. हा फोटो शेअर करताना नीना यांनी Frock का shock, गजराज सरांनी काढलेला फोटो असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

नीना यांच्या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. नीना यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारचा फोटो शेअर केलेला नाही. यापूर्वीसुद्धा असाच एक ग्लॅमरस लुकमधील फोटो नीना यांनी ट्विटरवर शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी चित्रपटात काम देण्याची मागणीसुद्धा केली होती. त्यांची ही ट्विटर पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

दरम्यान बधाई हो या सिनेमात नीना गुप्ता दिसल्या होत्या. या चित्रपटातील अभिनयाला नीना यांना दाद सुद्धा मिळाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना अॅवॉर्डसुद्धा मिळाले आहेत. आगामी काळात नीना गुप्ता या ‘सूर्यवंशी’, ‘पंगा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या सारख्या चित्रपटात दिसणार आहेत.

View this post on Instagram

#SachKahoonToe

A post shared by Neena Gupta (@neena_gupta) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -