उर्वशीच्या नावाने अंदमानमध्ये फुलणार फूल

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला

खूप कमी वेळामध्ये उर्वशी रौतेलाने बॉलीवूडमध्ये स्थान मिळवलं आहे. सिंग साहब दी ग्रेट या चित्रपटातून पदार्पण केलेल्या उर्वशीने २०१५ मध्ये मिस दिवा आणि मिस इंडिया हा पुरस्कार जिंकला. मात्र यावेळी उर्वशीला मिळालेला मान हा तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठीदेखील अभिमानाचा आहे.

ब्रह्मांडातील सर्वात सुंदर महिला उर्वशी

सौंदर्याचे अनेक पुरस्कार मिळालेली उर्वशी रौतेला ही बॉलीवूडमधील अशी एकमेव अभिनेत्री आहे. २०१८ चा यंगेस्ट मोस्ट ब्युटीफूल वूमन इन द युनिव्हर्स हा पुरस्कार तिला मिळाला आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या टूरिझम विभागाने हा पुरस्कार उर्वशी रौतेलाला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर हा पुरस्कार दिल्यानंतर अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह सरकार एका फुलालादेखील तिचे नाव देणार आहे. त्याठिकाणी फुलणारे हे फूल उर्वशीच्या नावाने आता फुलेल.

कोण आहे उर्वशी रौतेला?

उर्वशी रौतेला २०१५ मध्ये मिस इंडिया या स्पर्धेत जिंकली होती. त्याच वर्षी तिने मिस दिवा हा पुरस्कारदेखील जिंकला. सिंग साहब दी ग्रेट या चित्रपटातून २०१३ मध्ये तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, काबील आणि हेट स्टोरी ४ मधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यो यो हनी सिंगच्या अल्बममध्येदेखील उर्वशीने काम केले असून तिची अदा त्यावेळी चाहत्यांना खूपच आवडली होती. तसेच रेस ३ मध्ये तिचा गेस्ट अपिरिअन्स असल्याची चर्चा असून सध्या तिने आपल्या कोणत्याही बॉलीवूड प्रोजेक्टबद्दल सांगितलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे बरेच फॉलोअर्स आहेत. आपल्या इन्स्टाग्रामवर उर्वशी नेहमीच आपले फोटो पोस्ट करत असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here