घरट्रेंडिंग'म्हणून' हिमेश रेशमिया ढसाढसा रडला, रोहित राऊत ठरला इंडियन आयडल ११ चा...

‘म्हणून’ हिमेश रेशमिया ढसाढसा रडला, रोहित राऊत ठरला इंडियन आयडल ११ चा रनरअप|

Subscribe

इंडियन आयडल ११ चा फिनाले मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. ११चा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. फिनालेमध्ये सगळ्या स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स बघायला मिळाले. यावेळी स्पर्धकांचे पालक- नातेवाईक स्पर्धकांचा उत्साह वाढवायला आले होते. अखेर विजेत्याचं नाव जाहीर झालं आणि एकच जल्लोष झाला. इंडियन आयडॉल ११ चे विजेतेपद सनी हिंदुस्तानीने जिंकले.

- Advertisement -

 

सनीला इंडियन आयडलच्या ट्रॉफीबरोबर २५ लाख रूपयांचा धनादेश मिळाला. तर पहिल्या आणि दुसऱ्या रनरअपला प्रत्येकी ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. पहिला रनरअप रोहित राऊत ठरला तर दुसरी रनरअप ओंकना मुखर्जी ठरली. तर अद्रिज घोष तिसरा आणि रिधम कल्याण चौथा रनरअप ठरला.

- Advertisement -

जबरदस्त परफॉर्मन्सने सजला फिनाले

फिनालेला सगळ्याच स्पर्धकांनी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. सन्नी हिंदुस्तानी, लातूर चा रोहित राउत, अमृतसरचा रिधम कल्याण, कोलकाता चा अद्रिज घोष आणि ओंकना मुखर्जी च्या एकसे बढकर एक परफॉर्मन्सने सगळेच भारावले.

यंदाचा हा सीझन प्रमाणापेक्षा जास्तच लोकप्रिय ठरला. प्रत्येक स्पर्धकानं आपल्या सुरेल आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे शोची जज नेहा कक्कड आणि शोचा होस्ट आदित्य नारायणच्या लग्नाच्या चर्चेमुळे शो सतत चर्चेत राहिला.

हिमेश रेशमिया ढसाढसा रडला

हिमेश रेशमिया कोणत्याही शोमध्ये सहसा भावुक होत नाही. त्यानं आतापर्यंत स्वतःची अशी प्रतिमा तयार केली आहे की एखाद्या स्पर्धकाच्या गाण्यासाठी त्याचं उठून उभ राहणं सुद्धा खूप मोठी गोष्ट मानली जाते. पण या सीझनमध्ये तो अनेकदा स्पर्धकांसोबत गातानाही दिसला. पण ग्रँड फिनालेच्या वेळी असं काही झालं ज्यामुळे हिमेशला रडू कोसळलं. एवढंच नाही तर विशाल ददलानीलाही त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हिमेश रडताना दिसत आहे. इंडियन आयडॉलच्या ग्रँड फिनालेसाठी टॉप 5 मध्ये सामील झालेल्या अंकोना मुखर्जीनं हिमेशनं कंपोज केलेलं ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं गायलं. हे गाणं ऐकल्यावर हिमेश खुपच भावुक झाला आणि अचानक ढसाढसा रडू लागला. हिमेशला असं रडताना पाहून जज विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांनी त्याला आधार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -