घरमनोरंजनगीतात दडलंय स्त्रियांचं भावविश्व

गीतात दडलंय स्त्रियांचं भावविश्व

Subscribe

छोट्या पडद्यावर आठवड्याला ज्या मालिका दाखवल्या जातात, त्यात हमखास एकातरी मालिकेचे शिर्षक हे अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले असते. आजवरचा त्यांचा प्रवास लक्षात घेतला तर सर्वांत जास्त शिर्षकगीतांना त्यांनीच संगीत दिलेले आहे. त्यातही वैशिष्ठ्य म्हणजे बरीचशी शिर्षकगीते ही प्रेक्षकप्रिय ठरलेली आहेत. अनेक वाद्यवृंदात आयोजकांना ते गाणे सादर करण्याची इच्छा निर्माण होते. यावरून त्यांच्या शिर्षकगीताची खासियत काय आहे हे लक्षात येते. लवकरच स्टार प्रवाहवर ‘मोलकरीन बाई’ ही मालिका प्रसारित होत आहे. त्याच्या शिर्षकगीताची जबाबदारी अशोक पत्की यांच्यावर सोपवलेली आहे.

दिसरात पदरात जरी कष्टाच आंदण, दाराशी बांधलं तीनं स्वप्नांचं तोरण या शिर्षकगीताच्या ओळी आहेत. रोहिणी निनावे यांनी हे गीत लिहिले असून ऊर्मिला धनगर यांचे स्वर या गीताला लाभलेले आहे. नोकरदार स्त्रियांसाठी ज्या अनेक मूलभूत गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात, त्यात मोलकरीण ही असायलाच हवी असा त्यांचा आग्रह असतो. तिच्या एक दिवस न येण्याने दिवसभराच्या कार्यक्रमात विस्कळीतपणा जो येतो तो हैराण करणारा असतो. जशी राहणी तशी मोलकरीण असे काहीसे स्वरुप असल्याने ‘मोलकरीण बाई’ या मालिकेमध्ये वेगवेगळ्या स्तरातील महिलांचे दर्शन घडणार आहे. या मालिकेमध्ये सुप्रिया पाठारे, उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, अश्विनी कासार, गायत्री सोहम यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -