घरट्रेंडिंगलोकसभा निवडणूक झाली; आता राजकारण्यांना मिळालेत 'हे' अतरंगी पुरस्कार

लोकसभा निवडणूक झाली; आता राजकारण्यांना मिळालेत ‘हे’ अतरंगी पुरस्कार

Subscribe

राजकारणी हे सध्या गांभीर्याचे कमी आणि थट्टेचे विषय जास्त बनत चालले आहेत. कोणतीही घटना घडली वा कुणा नेत्यानी काही वक्तव्य केले की सोशल मीडियावर त्याचे मजेशीर मीम्स आलेच म्हणून समजा. विशेष म्हणजे राजकीय नेतेदेखील त्यांच्यावर झालेली मजेशीर बाब अगदी खेळीमेळीने घेते. राजकारण्यांमधील हाच एक गुण कदाचित लोकांना आवडत असावा. म्हणून की काय त्यांच्यावरील जोक्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकतच सोशल मीडियावर काही निवड राजकीय नेत्यांना देऊ गेलेल्या अॅवॉर्ड्सची चर्चा होत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वावर तसेच डायलॉगला अनुसरून हे पुरस्कार त्या त्या विभागासाठी देण्यात आले आहेत. या पुरस्कार यादीला राजकीय नेतेदेखील हसूनच दाद देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

असे आहेत पुरस्कार – 

सर्वोत्कृष्ट आजोबा – शरद पवार (चित्रपट – अनाकलनीय)

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजकारणातील भीष्म म्हटलं जात. त्यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव खुपच दांडगा आहे. त्यामुळे ज्येष्ठ असलेल्या पवारांच्या राजकीय डावपेच सर्वसामान्यच काय तर कसलेल्या राजकारण्यांनाही समजणार नाहीत. अशा अनुषंगाने शरद पवार यांना अनाकलनीय चित्रपटासाठी पुरस्कर दिला जात आहे.

सर्वोत्कृष्ट आजी – इंदिरा गांधी (चित्रपट – खतर- नाक)

- Advertisement -

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळेच कदाचित त्यांना खतरनाक चित्रपटासाठी पुरस्कार दिला असावा.

सर्वोत्कृष्ट वडिल – राधाकृष्ण विखे पाटील (चित्रपट – बापजन्म)

मुलाच्या हट्टापायी पक्ष सोडावे लागले. वडिल काँग्रेसमध्ये असतानाही सुजय विखे पाटील यांनी मात्र भाजप पक्षातून निवडणूक लढवली. आता राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजप पक्षाच्या मार्गावर आहेत. म्हणूनच कदाचित त्यांना बापजन्म चित्रपटासाठी निवडण्यात आले असावे.

सर्वोत्कृष्ट आई – सोनिया गांधी (चित्रपट – माझा छकुला)

राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली आई अशी वेगळी प्रतिमा सोनिया गांधी यांनी बनली आहे.

सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार – राज ठाकरे (चित्रपट – काका मला नाचवा)

लोकसभेत एकही उमेदवार न देता मोदीविरोधी सभांचा धडाका लावणाऱ्या राज ठाकरे यांना त्यांच्या वेगळ्या शैलीतील भाषणांसाठी, मिमिक्रीसाठी सोशल मीडियावर लोकप्रीय आहेत. अशावेळी राजकारणात शरद पवारांशी अप्रत्यक्षपणे त्यांचे नाव जोडले जात असल्याने काका मला नाचवा या चित्रपटासाठी त्यांनी निवड झाली आहे.

सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री) – उर्मिला मातोंडकर (चित्रपट – आनंदी (राम)गोपाळ (वर्मा)

बॉलीवूडमध्ये राम गोपल वर्मामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या करिअरला वेगळी उंची मिळाली. तसेच आनंदी गोपाळ हा देखील अभिनेत्रीच्या पदार्पणातील चित्रपट होता. त्यामुळे उर्मिलाच्या राजकीय क्षेत्रातील पदार्पणासाठी तिला हा पुरस्कार जाहीर झाला असावा.

सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) – पार्थ पवार (चित्रपट – (करा) चुका (घ्या) मुका)

आजोबा शरद पवार, वडिल अजित पवार असल्यामुळे पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली खरी पण लोकांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यामुळे पदार्पणातच चुका केलेल्या पार्थला हा पुरस्कार जाहीर झाला असावा.

सर्वोत्कृष्ट पाहुणा कलाकार – सँम पित्रोदा (चित्रपट – हुआ तो हुआ)

राफेल प्रकरणावर मधून बोलण्यासाठी समोर आलेल्या सँम पित्रोदा यांच्या हुआ तो हुआ या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट बालकलाकार – राहुल गांधी (चित्रपट – राऊल बाबा आणि चौकीदार चोर)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मोदींवरील चौकीदार चोर है या टिकेला उत्तर देण्यासाठी त्यांना राऊल बाबा आणि चौकीदार चोर या चित्रपटाचे लेबल लावले असावे. तसेच सोशल मीडियावर त्यांची पप्पू ही प्रतिमा लोकप्रीय झाली असल्याने बालकलाकार या विभागात त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट खलनायक – गिरीश महाजन (चित्रपट – अशी ही पळवापळवी)

लक्स फ्रेश न्यू फेस ऑफ दि इयर – प्रियंका गांधी (चित्रपट – भाऊबीज)

प्रत्येक संकटात भावासोबत खांद्याला खांदा लावून लढणारी बहिण प्रियांका गांधी हिची भाऊबीज या चित्रपटासाठी निवड झाली असावी.

जीवनगौरव पुरस्कार – सुशीलकुमार शिंदे (चित्रपट – सोनियाचा दीनू)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -