घरमनोरंजन'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'मध्ये अर्जुन कपूर वेगळ्या भूमिकेत

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’मध्ये अर्जुन कपूर वेगळ्या भूमिकेत

Subscribe

'इंडियाज मोस्ट वॉन्डेट'चं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा चित्रपट देशभक्तीपर असल्याचं अर्जुन कपूरने सांगितलं आहे. अर्जुनचे सध्या लागोपाठ तीन चित्रपट येणार असून हा चित्रपट देशभक्तीपर आहेत.

बॉलीवूडमधील अर्जुन कपूरकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. त्याचा येणारा चित्रपट ‘इंडियाज मोस्ट वॉन्डेट’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा चित्रपट देशभक्तीपर असल्याचं अर्जुननं सांगितलं आहे. या चित्रपटामध्ये गुप्त अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सोमवारीच या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आहे. ‘ही अतिशय भीतीदायक आणि वास्तविक कथा आहे. हा चित्रपट केल्यानंतर मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटत आहे. या चित्रपटामुळे तुमच्या मनात देशभक्ती नक्की जागृत होईल,’ असं अर्जुनने या चित्रपटाबाबत सांगितलं असून ही अशा नायकाची कथा आहे ज्याच्या शौर्याचं वर्णन अजूनपर्यंत झालेलं नाही असंही म्हटलं आहे. अशा हिरोंचा सन्मान आणि प्रशंसा व्हायला हवी असंही मत अर्जुननं म्हटलं आहे. राजकुमार गुप्ताद्वारे दिग्दर्शित करण्यात आलेला हा चित्रपट २४ मे, २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

अर्जुनचे तीन चित्रपट लागोपाठ

अर्जुन सध्या लागोपाठ तीन चित्रपटांचं चित्रीकरण करत असून पुढच्यावर्षी त्याचे हे तिनही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये परिणिती चोप्राबरोबर आलेला ‘नमस्ते इंग्लंड’ जास्त कमाल दाखवू शकला नाही. मात्र आता दिबाकर बॅनर्जीचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपटही अर्जुन परिणीतीबरोबर करत असून त्यानंतर ‘इंडियाज मोस्ट वॉन्डेट’ येणार असून आशुतोष गोवारीकरचा ‘पानिपत’ त्यानंतर प्रदर्शित होईल.

- Advertisement -

पटणामध्ये झालं चित्रीकरण

राजकुमार गुप्ताच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्डेट’चं सर्वात जास्त चित्रीकरण हे पटणा शहरामध्ये झालं आहे. ‘पटणामध्ये चित्रीकरण करणाऱ्या अभिनेत्यांपैकी मी पण एक आहे याचा मला अभिमान आहे,’ असं यावेळी अर्जुनने सांगितलं. बिहारमध्ये चित्रीकरण करण्यासाठी बरेच कलाकार असुरक्षित समजतात. मात्र अर्जुनला अजिबात असं वाटत नाही. ‘या ठिकाणी मला खूप प्रेम मिळालं. तिथली संस्कृती खूपच चांगली आहे. इथे चित्रीकरण झाल्यानंतर मी माझ्यातील नकारात्मकता बदलू शकलो तर मला नक्की आनंद होईल. इतर कलाकारदेखील बिहार आणि पटणामध्ये चित्रीकरणासाठी येतील अशी मला आशा आहे,’ अशी भावना अर्जुननं व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -