जॉनी रावतचा इन्स्पेक्टर चिंगम

Mumbai
jony rawat

नाटक, चित्रपट, मालिकेत काम करणार्‍या नवकलाकारांची संख्या काही कमी नाही. प्रथमच पदार्पण करणार्‍या कलाकाराला अनेक समस्यांतून जावे लागते. योग्य भूमिका, योग्य मानधन मिळेलच याची खात्री देता येत नाही. मग प्रतिक्षेत असलेल्या अशा कलाकारांसाठी वेबसिरिज, यूट्यूब चॅनल जवळचे वाटलेले आहे आणि अशा या मालिकेत नावाजलेल्या कलाकाराने काम करण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी आणखीन एक पर्वणीच असते. आगरी भाषेत विनोदाची तूफान बॅटिंग करणार्‍या जॉनी रावतसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरलेला आहे. पहिलं म्हणजे त्याचा सहभाग असलेला ‘मुंबईचा किनारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि दुसरीकडे वेबसीरिजच्या माध्यमातून ‘इन्स्पेक्टर चिंगम आणि मराठी माणूस’ ही त्याची वेबसीरिज सोशल नेटवर्कवर दाखवणे सुरू झालेले आहे.

अमराठी लोकं व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येत आहेत, सोसायट्या करून रहात आहेत. त्याचा त्रास मराठी माणसाला होत आहे. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे काम इन्स्पेक्टर चिंगम हा या वेबसीरिजच्या माध्यमातून करतो. जनमाणसातील आपली लोकप्रियता लक्षात घेऊन जॉनीने या इन्स्पेक्टरची बोलीभाषा आगरीच ठेवलेली आहे. राकेश शिर्के याने त्याचे लेखन, दिग्दर्शन केलेले आहे. जॉनीने नवकलाकारांबरोबर काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे त्यांच्यात प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे. भारत जगधने, स्मिता शिर्के, गायत्री बारिया, राकेश पडवळ यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. ‘मराठी माणसा शहाणा हो’ असे काहीसे सांगण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here