‘रेस ३’ बद्दल तुम्हाला ‘हे’ माहीत आहे का?

Mumbai
race 3
रेस ३ चित्रपट (हिंदुस्तान टाईम्स)

रमजान ईद आणि सलमानचा चित्रपट हे गेली बऱ्याच वर्षाचं समीकरण. येत्या १५ जूनला रेमो डिसुझा दिग्दर्शित सलमान खानचा ‘रेस ३’ येत आहे. या चित्रपटात सलमानबरोबरच कलाकारांची मोठी मंदियाळी आहे. अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, साकीब सलीम, डेझी शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पण या चित्रपटाबद्दल तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत का?

सेन्सर बोर्डानं दिली क्लीन चीट

चित्रपटाला सेन्सर बोर्डानं क्लीन चीट दिली असून यु/ए प्रमाणपत्र दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटातील एकाही सीनला बोर्डानं कात्री लावलेली नाही. या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं बोर्डानं सांगितलं आहे.

२ तास ४० मिनिटांचा आहे चित्रपट

या अॅक्शन पॅक्ड चित्रपटाचा कालावधी १६० मिनिटं अर्थात २ तास ४० मिनिटांचा आहे. स्टार्ट आणि एन्ड क्रेडिट मिळून हा कालावधी आहे. एका ऑनलाईन पोर्टलला रेमोनं या वृत्तसंदर्भात दुजोरा दिला आहे.

शाहरूखच्या ‘झिरो’चं टीझर दाखवणार

चित्रपटगृहात ‘रेस ३’ च्या प्रिंटपूर्वी शाहरूखच्या ‘झिरो’चं टीझर दाखवण्यात येणार आहे. शाहरूखचा हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर ‘रेस ३’ हा यशस्वी रेस या चित्रपटाचा तिसरा भाग आहे.

विविध तऱ्हेनं शूट केला आहे क्लायमॅक्स

निर्मात्यांनी ‘रेस ३’ चा क्लायमॅक्स वेगवेगळ्या तऱ्हेनं शूट केला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या काही व्यक्तिंव्यतिरिक्त कोणालाही याचा क्लायमॅक्स काय आहे याची कल्पना नाही. संपूर्ण युनिट आणि क्रू यांनादेखील क्लायमॅक्स माहीत नाही. मात्र, सलमाननं असं काही नसल्याचं सांगितलं होतं.

पहिल्या दोन भागातील फक्त अनिल कपूर दिसणार

आधीच्या दोन्ही भागातील फक्त अनिल कपूर हा एकच कलाकार ‘रेस ३’ मध्ये दिसणार आहे. या आधीच्या भागांमध्ये त्यानं गुप्तहेराची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेमध्ये अनिल कपूर प्रेक्षकांना दिसेल.